जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या विरोधात नंदुरबार येथील समस्त आदिवासी पावरा समाज मंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर….

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या विरोधात नंदुरबार येथील समस्त आदिवासी पावरा समाज मंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर…. नंदुरबार आदिवासी जिल्हयातील सर्व सामान्य जनतेला अपेक्षीत, दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतील व येथील आरोग्याचे स्थानिक मुलभूत प्रश्न जसे सिकलसेल, भुकबळी (कुपोषण), मातामृत्यु, बालमृत्यु हे हद्दपार होतील अशी महत्वाकांक्षा बाळगली जात होती परंतु काही अधिकाऱ्यांच्या मनमर्जी कारभारामुळे या समस्या जिल्ह्यात जशाच्या तशा आहेत आताचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ वर्षा लहाडे याही त्याला अपवाद नाही. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे यांच्या मनमर्जी कारभारामुळे आज जिल्हा रुग्णालाची अवस्था बिकट झाली आहे .अधिकारी व कर्मचारी यांना दबावात ठेवणे, अरेरावीची भाषा वापरणे, अभ्यंगतांना मोबाईल कॅबीन बाहेर ठेवायला लावणे.

वैद्यकिय अधिकाऱ्यांचे मासिक खच्चीकरण करणे. प्रतिनियुक्तीचे अधिकार नसतांना आदेश देणे किंवा रद्द करणे, तदर्थ नुतनीकरण करणे यासाठी, आर्थिक व्यवहार करणेस भाग पाडणे या सारख्या तक्रारी त्याच्या विरोधात प्राप्त झाल्या आहेत. आदिवासी भागात काम करण्यासाठी विशेष प्रोत्साहन भत्ता लागु करण्यासाठी आर्थिक देवाण घेवाणाची मागणी केली जाते. कर्मचाऱ्यांचे पुर्ननियुक्ती आदेश जुलै महिणन्यात दिले जातात परंतु ते आदेश देण्यास सहा महिणे विलंब करणे, सी आर ,वेतन पळताळणी, रजा मंजुरी यासाठी आर्थिक व मानसिक त्रास देणे मला कोणाची भीती नाही व मी कोणाला भीत नाही याबाबतीत चौकशी करून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ वर्षा लहाडे यांच्यावर कारवाई करून यांची तात्काळ बदली करावी अशी या मागणी नंदुरबार येथील समस्त आदिवासी पावरा समाज मंडळ तर्फे जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांना निवेदन देण्यात आले निवेदनावर नामदेव पटले प्रा सरदार पावरा झेलसिंग पावरा डॉ मनोज पावरा डाॅ.सायसिंग पावरा डॉ रंजीत पावरा डॉ किसन पावरा डॉ मंगलसिंग पावरा डॉ संजय पटले इंजिनीयर राकेश पावरा डॉ किसनजी पावरा इदास पावराभरतसिंग पावरा किसन पावरा एम एस पावरा मंगलसिंग पावरा संजय पटले यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

  • Related Posts

    बाभुळगाव येथील शेत रस्त्यांचे प्रश्न एरणीवर आगामी निवडणुकींवर बहिष्कार टाकण्याचा शेतकऱ्यांच्या इशारा लोकप्रतिनिधींनी दिलेली आश्वासने ठरताहेत फेल…

    बाभुळगाव येथील शेत रस्त्यांचे प्रश्न एरणीवर आगामी निवडणुकींवर बहिष्कार टाकण्याचा शेतकऱ्यांच्या इशारा लोकप्रतिनिधींनी दिलेली आश्वासने ठरताहेत फेल… धरणगाव‌ तालुका प्रतिनिधि – राजु बाविस्कर तालुक्यातील बाभुळगाव येथील शेत रस्त्यांची अवस्था अतिशय…

    स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अरीज बेग मिर्झा चोपडा येथे काँग्रेस पक्षाची आढावा बैठक.

    स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अरीज बेग मिर्झा चोपडा येथे काँग्रेस पक्षाची आढावा बैठक. चोपडा :- पक्ष सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांचा काही फायदा होत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.