चालकाला आली डुलकी : समृद्धी महामार्गावर दोन चारचाकीचा अपघात !

राज्यातील समृद्धी महामार्गावर  अपघाताच्या घटना घडत असतांना आता पुन्हा एकदा सिन्नर  तालुक्यातील मर्‍हळ शिवारात समृद्धी महामार्गावर चालकाला डुलकी आल्याने महिंद्रा एक्सयूव्ही कारने पुढे चाललेल्या किया कारला धडक दिल्याने दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि. 2) सकाळी 8 च्या सुमारास घडली.

सविस्तर वृत्त असे कि, संतोष मोहिते (38) हे आपल्या कारने (एमएच 14, जेए 5301) ने आपल्यासमवेत काही जणांना घेऊन नागपूरकडून सिन्नरच्या दिशेने येत होते. मर्‍हळ शिवारात आल्यानंतर मोहिते यांना झोप आल्याने त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे त्यांची कार पुढे चाललेल्या किया कारला (एमएच 20, एफवाय 2255) जाऊन धडकली. यात मोहिते व किया कारचे चालक जयंत कुलकर्णी हे गंभीर जखमी झाले. दोन्ही कारमध्ये असलेले राहुल साळुंखे (32), उद्धव महाजन (32), शुभम शिंदे (26), सचिन चव्हाण (38), अमोल अरोडकर (38), राहुल साटम (38) यांना सुदैवाने काहीही झाले नाही. अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गाचे पथक व वावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जखमींना तत्काळ उपचारासाठी सिन्नर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. महामार्ग पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.