अकोल्यात ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका चिमुकलीचा दुर्दैव मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी ठिय्या दिला होता. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.अकोला जिल्ह्याच्या अकोट शहरातील अकोला नाका ब्रिजवर भीषण अपघात झाला. दर्यापूर मार्गावर ट्रक आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात होऊन निधी दिपक जेस्वानी, वय अंदाजे ७ वर्ष या चिमुकलीचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चिमुकलीच्या जाणाने, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.










