वसईच्या बाभोळा येथे असलेल्या मयंक ज्वेलर्स या सराफाच्या दुकानावावर १० जानेवारी रोजी दोन अनोळखी दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला होता.वसईतील मयंक ज्वेलर्स दुकानावर घालण्यात आलेल्या दरोड्याचा उलगडा करण्यात माणिकपूर आणि वालीव पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे. विचित्र अशा दुचाकीच्या हॉर्नच्या आवाजामुळे या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.










