भारताने मागितली तेहरानकडे मदत, इराणमध्ये पोहोचताच भारतीयांचा कुटुंबीयांशी संपर्क तुटला.

भारताने तेहरानकडे इराणमध्ये तीन नागरिक बेपत्ता झाल्यानंतर मदत मागितली आहे. हे तिन्ही नागरिक तेथे व्यवसायानिमित्त गेल्याचे समजते. मात्र तेथे पोहोचताच त्यांचा कुटुंबीयांशी संपर्क तुटला. बेपत्ता झालेल्या नागरिकांचा हा मुद्दा भारताने तेहरानसमोर गांभीर्याने मांडला आहे.
भारताने तेहरानकडे इराणमध्ये तीन नागरिक बेपत्ता झाल्यानंतर मदत मागितली आहे. हे तिन्ही नागरिक तेथे व्यवसायानिमित्त गेल्याचे समजते. मात्र तेथे पोहोचताच त्यांचा कुटुंबीयांशी संपर्क तुटला. बेपत्ता झालेल्या नागरिकांचा हा मुद्दा भारताने तेहरानसमोर गांभीर्याने मांडला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ही माहिती दिली आहे.

जैस्वाल म्हणाले की, हे तीन भारतीय नागरिक इराणला व्यावसायिक कारणासाठी गेले होते. आणि तेथे पोहोचल्यानंतर काही वेळातच त्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क तुटला. आम्ही त्या तीन बेपत्ता नागरिकांच्या कुटुंबीयांच्या सतत संपर्कात आहोत. आम्ही हा मुद्दा दिल्लीतील इराणच्या दूतावासाकडे मांडला आहे. यासोबतच तेहरानमधील इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाशीही याबाबत संपर्क साधण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.रणधीर जयस्वाल पुढे म्हणाले की, परराष्ट्र मंत्रालय आणि तेहरानमधील भारतीय दूतावास, इराणच्या अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असून बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही असेही म्हटले आहे की, आम्ही इराणी अधिकाऱ्यांना बेपत्ता नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सहकार्य करू. बेपत्ता झालेले तिन्ही भारतीय नागरिक डिसेंबरमध्ये इराणला गेल्याचे सांगण्यात येत आहे.तर, रशियामध्ये बेपत्ता भारतीयांवर जयस्वाल म्हणाले की, रशियामध्ये १६ लोक बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी आम्ही रशियन अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. परराष्ट्र मंत्रालयाने १७ जानेवारी रोजी सांगितले होते की, युक्रेन युद्धात रशियन सैन्यासाठी काम करताना किमान १२ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर इतर १६ बेपत्ता आहेत. जैस्वाल म्हणाले की, रशियन सैन्यात कार्यरत असलेल्या भारतीय नागरिकांची एकूण १२६ प्रकरणे आहेत.जयस्वाल म्हणाले की, जे अजूनही रशियामध्ये आहेत त्यांची लवकर सुटका करण्याची मागणी भारताने केली आहे. या १२६ प्रकरणांपैकी ९६ लोक रशियन सशस्त्र दलातून डिस्चार्ज होऊन भारतात परतले आहेत. रशियन सैन्यात अजुनही १८ भारतीय नागरिक शिल्लक आहेत. आणि त्यापैकी १६ जणांचा ठावठिकाणा अद्यापही लागलेला नाही.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.