शुल्क नियामक प्राधिकरणाचा कारभार हा भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक पध्दतीने चालवा,

शुल्क नियामक प्राधिकरणाचा कारभार हा भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक पध्दतीने चालवा,  शुल्क निर्धारणसाठी संस्थांनी खोटी माहिती सादर केल्यास कडक कारवाई करणार. शुल्क नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष निवृत न्यायाधिश  विजय आचलिया यांचे आश्वासन.


व्यवसायीक महाविद्यालयाचे शैक्षणीक शुल्क निर्धारण करणार्या शुल्क नियामक प्राधिकरणाचा कारभार हा अत्यंत बेजबाबदार पद्धतीने सुरू आहे. विद्यार्थी, पालक व समाज यांच्यावर दुरगामी परिणाम करणार्या शुल्क नियामक प्राधिकरणाचा कारभार हा भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक पध्दतीने चालवा ह्या साठी टॅफनॅप, मुक्ता,सारती व इतर समविचारी संघटना यांनी संयुक्तपणे व्यापक अभियान सुरू केले आहे. या अभियानाचाच एक भाग म्हणून मंगळवार दि. 9 जुलै 2024 रोजी ह्या संघटनांच्या प्रतिनिधींनी शुल्क नियामक प्राधिकरणाच्या अध्यक्ष व इतर पदाधिकार्यांचीं भेट घेऊन एक निवेदन सादर केले.

शैक्षणिक शुल्क निश्चित करीत असतांना संस्थाकडून घेण्यात याणारे शपथपत्र, शुल्क निश्चिती साठी प्राधिकरणा तर्फे करण्यात आलेले नियम, माहिती अधिकार कायद्यातील तरतुदी ह्या सर्वांचीं अंमलबजावणी प्रभावीपणे होणे गरजेचे आहे. ह्यावर सर्व उपस्थितांचे एक मत झाले. संस्थेने दिलेल्या शपथपत्रा नुसार सन 2024-25 साठी ज्या संस्थांचे शिक्षण शुल्क ठरविण्यात आले आहे अश्या संस्थांना तत्काळ शैक्षणीक शुल्क निर्धारणाचा पूर्ण प्रस्ताव सर्व प्रपत्रांसह संबंधित काॅलेजच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात यावा व ज्या संस्थांचे शुल्क अद्याप ठरविण्यात आलेले नाही अशा संस्थांनी शुल्क निर्धारणाचा पूर्ण प्रस्ताव वेबसाईटवर उपलब्ध केल्याशिवाय त्यांचे शुल्क निर्धारण करण्यात येऊ नये. ह्या साठी कारवाई करण्याचे मान्य करण्यात आले. शुल्क नियामक प्राधिकरणाकडे संस्थेतर्फे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला मान्यताप्राप्त कर्मचार्याच्या बाबत दिलेली माहिती पडताळून पाहण्यासाठी सध्या ठोस यंत्रणा नाही. अपुर्या कर्मचारी संख्येमुळे ही पडताळणी करणे अवघड आहे. ह्या साठी संघटनातरफे Controlling Authorities म्हणजे AICTE / DTE यांचे कडे पाठपुरावा करावा अशी सुचना करण्यात आली.

प्राधिकरणातर्फे भविष्यात वापरण्यात येणार्या आधुनिक संगणक प्रणाली मध्ये ही माहिती पडताळून पाहण्या साठी योग्य ती तरतुद करण्यात येईल. असे प्राधिकरणातर्फे सांगण्यात आले. विद्यार्थी, पालक व सामान्य जनता यांच्या दृष्टीने माहिती शुल्क नियामक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर देण्यात येणारी माहिती ही अत्यंत महत्वाची असते. तथापि प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर बर्याच महत्वाच्या गोष्टींचीं माहिती उपलब्ध नाही. अथवा दिलेली माहिती अपुरी आहे. ह्या मध्ये तत्काळ सुधारणा करण्याचे आदेश देण्यात येतील असे सांगण्यात आले. माहिती अधिकार कायदा कलम 4 ( 1) बी च्या तरतुदीनुसार शुल्क नियामक प्राधिकरणाने 17 अनिवार्य बाबिंची माहिती त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित करणे अनिवार्य आहे. तथापि या 17 अनिवार्य बाबिंन पैकी एकाही अनिवार्य बाबींची माहिती शुल्क नियामक प्राधिकरणाच्या वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात आलेली नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे. ह्या बाबत त्वरीत कारवाई करून ही त्रुटी दुर करण्यात येईल असे सांगण्यात आले.


संघटनेच्या प्रतिनिधी तर्फे संस्थाकडून करण्यात आलेल्या गैरव्यवहारांचे पुरावे सादर करण्यात आले. ह्या बाबत वेगळी बैठक घेऊन संघटनातर्फे सादर करण्यात आलेल्या माहितीची सत्यता पडताळून संबंधित संस्था, प्राचायॅ अथवा संस्थाचालक यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन प्राधिकरणाच्या प्रतिनिधींनी दिले.
भविष्यकाळात अश्याच प्रकारे संघटनांचे प्रतिनिधी व शुल्क नियामक प्राधिकरणाचे कामकाज पारदर्शक पध्दतीने पार पाडले जाईल या बाबत सर्व संबंधितांनीं विश्वास व्यक्त केला. ह्या बैठकीसाठी टॅफनॅप चे सचिव श्रीधर वैद्य, मुक्ता संघटनेचे महासचिव प्रा. डाॅ.सुभाष आठवले, प्रा. राम यादव, प्रा. वाघमारे, प्रा.सचिन शिंदे, प्रा. शंतनु काळे, व इतर प्रतिनिधी उपस्थित होते.

  • Related Posts

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड-तेल्हारा राज्य मार्गावर भीषण अपघात घडला आहे. लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटून भीषण अपघात घडला आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड-तेल्हारा राज्य मार्गावर भीषण अपघात घडला…

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले. गावागावातून हिंदु राष्ट्राची मागणी!  जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील आव्हाणी गावात हिंदुराष्ट्रआव्हानी नावाचे फलकाचे अनावरण शुभ हस्ते करण्यात आले. हिंदू…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

    वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द