प्राध्यापकांना पूर्वलक्षी प्रभावाने पदोन्नती मिळाली यासाठी एन्-मुक्ता संघटनेचे सहसंचालकांना निवेदन,

जळगाव: महाराष्ट्र शासनाने दिनांक 24 जून 2024 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार उशिरा ओरिएंटेशन व रिफ्रेशर कोर्स झालेल्या प्राध्यापकांना पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या दिनांकापासून पदोन्नती मिळावी, यासाठी ‘नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशन (एन्-मुक्ता) या प्राध्यापक संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष डॉ. नितीन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली मा. सहसंचालक, उच्च शिक्षण, जळगाव यांना निवेदन देण्यात आले. अनेक महाविद्यालयांमध्ये ओरिएंटेशन व रिफ्रेशर कोर्स करण्यासाठी प्राचार्य प्राध्यापकांना सोडत नव्हते. त्यामुळे बऱ्याचशा प्राध्यापकांचा ओरिएंटेशन व रिफ्रेशर कोर्स उशिरा झाला. तथापि, पदोन्नतीसाठी युजीसी व महाराष्ट्र शासनाने ओरिएंटेशन व रिफ्रेशर कोर्सेस अत्यावश्यक केला असल्याने बऱ्याचशा प्राध्यापकांना पदोन्नतीसाठीच्या पात्रतेच्या तारखेपासून मिळणाऱ्या पदोन्नती पासून वंचित राहावं लागलं आहे. यामुळे अनेक प्राध्यापकांच फार मोठ आर्थिक नुकसान झालेलं दिसून येत आहे.









