धरणगाव – पोलीसांच्या नाकावर टिच्चून की पोलिसांचाच आश्रयात, अवैध गुटख्याच्या कारवाईने धरणगाव तालुक्यात उलटसुलट चर्चा. धरणगाव – धरणगाव पोलिस स्टेशन च्या हद्दीत असलेले ग्रामीण भागात व शहरात, किराणा दुकाने, व पाण टपरींवर राजरोसपणे कोणतीही भिती न बाळगता गुटखा विक्री केला जात आहे, आरोग्यास हानिकारक म्हणून राज्यात गुटखाबंदी असूनही धरणगाव तालुक्यात अवैध गुटखा विक्री जोमात सुरू आहे, विशेष म्हणजे काही किराणा मालाच्या दुकानातून घाऊक विक्री होत आहे,संबंधित विभागाने त्वरित लक्ष घालून याला आळा घालावा, अशी मागणी परिसरातून होत आहे, रात्रीच्या अंधारात खाजगी वाहनातून अवैधरित्या आयात करून या खुलेआम विक्रीकडे पोलिस , अन्न व औषध प्रशासन लक्ष देत नसल्याचे बोलले जात आहे तंबाखूजन्य पदार्थ गुटखा आरोग्यास हानिकारक असल्यामुळे त्यापासून कर्करोगासारखे गंभीर आजार होतात
या पदार्थाचे सेवन करणाऱ्याला सावधानतेचा इशाराही गुटखा, तंबाखूच्या पुड्यांवर नमूद केला जातो, तरुण पिढी जीव घेण्या आजारापासून वाचावी यासाठी शासनाने यावर बंदीही घातली आहे तरीही धरणगाव तालुक्यात पानटपरीवर तसेच किराणा दुकान या ठिकाणी राजरोसपणे गुटखा विक्री सुरू आहे,नागरिक कर्करोगासारख्या जीव घेण्या आजाराला बळी पडू नयेत म्हणून गुटखा सुगंधित तंबाखू खरा आदी वस्तूंवर कायद्याने बंदी आणली होती, परंतु त्यानंतरही येथील काही दुकानांवर किराणामालाच्या नावाखाली संबंधित गुटख्याची घाऊक विक्री सहजपणे करताना दिसून येत आहे, धरणगाव तालुक्यात बऱ्याच ठिकाणी शाळेजवळ पान टपरीवर कॉलेज जवळ गुटखा विक्री केला जातो, धरणगाव पोलीस स्टेशनच्या आजूबाजूला व बस स्टॅन्ड च्या आवारात व धरणगाव शहरात ग्रामीण भागात गुटखा विक्री जोमात सुरू आहे,धरणगाव पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहे,महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी आहे, त्यामुळे गुटखा विक्री सर्रास होत असल्याने हा गुटका कुठून येतो असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत असतो, त्यास दरम्यान गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई का होत नाही असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण होत आहे,धरणगाव शहरातील कुठल्याही पान ठेल्यावर गुटखा उपलब्ध असतो इतकच काय खेड्यापाड्यात ही सरासपणे किराणा दुकानात सुद्धा गुटका विक्री होत असतो त्यामुळे गुटखाबंदी असतानाही शहरात महाराष्ट्रात गुटखा येत असतो,गुटक्यामुळे देशाचे भावी आधारस्तंभ असलेल्या तरुण पिढीचे आरोग्य धोक्यात आहे यामुळे व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात वाढत असून युवा पिढी गारद होत आहे ही मोठी सामाजिक हानी आहे जाणीवपूर्वक दुर्लक्ष पोलीस, अन्न व औषधी प्रशासन विभागाने विक्री कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे सर्रास विक्री सुरू आहे प्रत्येक गाव पाड्यावर शाळा महाविद्यालय परिसरातून पुड्या मिळतात असे असतानाही संबंधित यंत्रणेला कोणाच्याही आरोग्याची काळजी दिसत नाही,तरी या गोष्टीवर संबंधित विभागाने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.









