जळगाव जिल्ह्याचे क्रीडा पुरस्कार जाहीर; पालकमंत्र्यांचे हस्ते होणार गौरव.

जळगाव जिल्ह्याचे क्रीडा पुरस्कार जाहीर; पालकमंत्र्यांचे हस्ते होणार गौरव महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हास्तरावर उत्कृष्ट क्रीडापटू, दिव्यांग खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी दरवर्षी २६ जानेवारी रोजी क्रीडा पुरस्कार प्रदान केले जातात. या वर्षी सन २०२२-२३, २०२३-२४ व २०२४-२५ या तीन वर्षांचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून 26 जानेवारी रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या खेळाडुंचा गौरव होणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी सांगितले सदर पुरस्कार जळगाव जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना जाहीर करण्यात आले असून, पुरस्कार वितरण समारंभ २६ जानेवारी २०२५ रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय कार्यक्रमात होणार आहे.

सन २०२२-२३ मधील पुरस्कार विजेते: गुणवंत पुरुष खेळाडू: स्वप्नील कैलास महाजन (आट्यापाट्या) गुणवंत महिला खेळाडू: श्रीमती निवेदिका बाळकृष्ण कोळंबे (आट्यापाट्या) गुणवंत क्रीडा मार्गदर्शिका: श्रीमती सीमा रामचंद्र माळदकर (हँडबॉल) सन २०२३-२४ मधील पुरस्कार विजेते: गुणवंत पुरुष खेळाडू: उदय अनिल महाजन (वेटलिफ्टिंग) गुणवंत महिला खेळाडू: श्रीमती रोशनी सलीम खान (आट्यापाट्या)सन २०२४-२५ मधील पुरस्कार विजेते: गुणवंत पुरुष खेळाडू: पुष्पक रमेश महाजन (तायक्वान्डो) गुणवंत महिला खेळाडू: श्रीमती नेहा नितीन देशमुख (सॉफ्टबॉल)गुणवंत क्रीडा मार्गदर्शक: प्रा. डॉ. जयंत भालचंद्र जाधव (सॉफ्टबॉल)हा उपक्रम क्रीडा संस्कृती वाढवण्यास व नवोदित खेळाडूंना प्रेरणा देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी सांगितले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.