घराच्या हॉलमध्ये भाऊ व मोठी बहीण नातेवाइकांशी बोलत असताना प्रीतीने खोलीत जाऊन घरात असलेले रॉकेल स्वत:च्या अंगावर ओतून घेतले आणि स्वत:ला पेटवून घेतले. ही घटना तिच्यासोबत असलेल्या बहिणीच्या आठवर्षीय मुलीने पाहिली.बिटको रुग्णालयात वडिलांचे निधन झाल्याची बातमी समजताच तरुण मुलीने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना जेलरोड येथे घडली. वडील व मुलीवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.










