पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा 26 जानेवारीचा जळगाव जिल्हा दौरा. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री, गुलाबराव पाटील यांचा प्रजासत्ताक दिनानिमित्त जळगाव जिल्ह्यातील नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.सकाळी 08.10: पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव,सकाळी 08.15: जळगाव येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण,सकाळी 08.30: विश्रामगृह येथे आगमन व राखीव,सकाळी 09.05: जळगाव पोलीस कवायत मैदानाकडे प्रयाण,सकाळी 09.13: कवायत मैदान येथे आगमन व स्वागत,सकाळी 09.15: ध्वजारोहण, राष्ट्रगीत, राज्यगीत व सलामी, सकाळी 09.20: परेड कमांडर यांच्याकडून परेडची माहिती, सकाळी 09.25 ते 10.10:परेड निरीक्षण, मंत्री महोदयांचे प्रजासत्ताक दिन विशेष भाषण, जिल्हा उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार व प्रमाणपत्र वितरण.

संयुक्त संचलन (पोलीस, होमगार्ड, एनसीसी व शालेय विद्यार्थी), जिल्ह्यासाठी शासकीय निधीतून उपलब्ध वाहनांचे लोकार्पण, सकाळी 10.15: सांस्कृतिक कार्यक्रम, सकाळी 10.50: स्वातंत्र्यसैनिक व नागरिकांना शुभेच्छा भेट, सकाळी 10.55: चहापान कार्यक्रम, सकाळी 11.00: अजिंठा विश्रामगृहाकडे प्रयाण व राखीव,सकाळी 11.15: धनश्री नगर प्रभाग क्र. 8 येथे भूमीपूजन, सकाळी 11.30: मुसळी, ता. धरणगाव येथे शेतकऱ्यांना अॅग्रीस्टेक अंतर्गत प्रमाणपत्र वाटप,दुपारी 01.30: चिंचोली, ता. जळगाव कडे प्रयाण,दुपारी 01.45: चिंचोली येथे कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 02.30: पाळधी कडे प्रयाण व राखीव, दुपारी 03.00: चोपडा शहराकडे प्रयाण, दुपारी 04.00: चोपड्यातील संस्कार मंडपम येथे नागरी सत्कार सोहळा, संध्याकाळी 07.00: जळगावकडे प्रयाण व नियोजित कार्यक्रमास उपस्थिती, सोईनुसार: पाळधी, ता. धरणगाव कडे प्रयाण व राखीव.








