झाडावर आदळून स्कूल बस पलटी, शाळेत जाण्याआधीच नववीच्या विद्यार्थिनीवर काळाचा घाला

यवतमाळमध्ये स्कूल बसचा भयानक अपघात झाला असून एका विद्यार्थिनीचा मृत्यू आहे. या अपघातात 11 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून बसचालक फरार झाला आहे. उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत.यवतमाळमध्ये भीषण अपघाताची घटना घडलीये. स्कूल बसचा मोठा अपघात झाला. या अपघातात एका विद्यार्थिनीचा जागीच जीव गेला आणि 11 विद्यार्थी गंभीर जखमी आहेत. 30 विद्यार्थ्यांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सध्या सुरू आहेत. ही घटना यवतमाळच्या उमरखेडमधील पिंपरी दिवटी गावाजवळ घडली. शाळेत जात असताना बसचा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातानंतर हळहळ व्यक्त केली जातंय.

हा अपघात उमरखेड तालुक्यातील पिंपरी दिवटी गावाजवळ सकाळी आठच्या दरम्यान झाला आहे. नववीत शिकणारी महिमा आप्पाराव सरकटे (वय 15) असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. हे सर्व विद्यार्थी दहागाव येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतात. आज सकाळी सर्व विद्यार्थी दिवटी पिंपरीवरून स्कूल बसने दहागावला शाळेत जात असताना बसचा स्टेअरिंगरॉड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले.बसचा स्टेअरिंगरॉड तुटल्याने ही बस थेट एका झाडावर आदळली आणि पलटली झाली. धक्कादायक म्हणजे अपघाताची घटना घडताच बसचालक हा घटनास्थळावरून फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले. विद्यार्थ्यांना ग्रामस्थांनी उमरखेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासात महिमा सरकटे या विद्यार्थीला मृत घोषित केले.

अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून अपघातग्रस्तांना तातडीने सर्व प्रकारची मदत करण्याचे निर्देश दिले. अपघातासाठी दोषी असलेल्यांवर गुन्हे दाखल करून घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व शाळांच्या स्कूल बसची तपासणी करण्याचे आदेश देखील संजय राठोड यांनी दिले आहेत. या अपघातानंतर आता स्कूल बस चालकाचा शोध हा घेतला जातोय. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळत आहे. अपघातानंतर अधिकाऱ्यांनीही रूग्णालयात धाव घेतली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.