महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या नेतृत्वात. महाराष्ट्रात 11 जानेवारी ते 25 जानेवारी 2025 दरम्यान” संविधान गौरव अभियान” राबवण्यात आले आहे. याचा अभियानाचा एक भाग म्हणून जळगाव शहरातील पिंपराळा प्रभागात नवनिर्वाचित आमदार भोळे यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा शहर कार्यकारिणीच्या समन्वयातून व पाच शाळांचा सक्रिय सहभागातून खालील प्रमाणे निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. महाराणा प्रताप विद्यालय प्रेम नगर जळगाव श्री भगीरथ केशरलाल सोमानी माध्यमिक विद्यालय पिंपराळा पांडुरंग मुरलीधर मुंदडे हायस्कूल पिंपराळा कै गिरजाबाई नथू शेठ चांदसकर माध्यमिक विद्यालय विद्यानगर पिंपराळा ज्ञानसाधना माध्यमिक विद्यालय नवीन हायस्कूल पिंप्राळा जळगाव. निबंध लेखन स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा यशस्वीरित्या पीएम मुंदडा हायस्कूल पिंपराळा येथे राबविण्यात आले .
आज दिनांक 25 1 2025 रोजी स्पर्धेत विद्यार्थी मान्यवर समक्ष परीक्षकासमोर आपले वक्तृत्व सादर करण्यात आले त्यापैकी एका विद्यार्थ्याला वक्तृत्व स्पर्धेत निवड करण्यात आली तसेच निबंध स्पर्धेत प्रत्येकी शाळेमधून प्रथम द्वितीय तृतीय विद्यार्थ्यांचा ट्रॉफी प्रमाणपत्र व भारतीय संविधानाची उद्देशिकाची प्रत देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे लेखन केलेल्या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंदांनी त्यांचे परीक्षण करून योग्य प्रकारे मूल्यांकन केले व त्यानुसार क्रमांक एक ते तीन पारितोषिके ठरवण्यात आली. त्यानिमित्त जळगाव लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार श्रीमती स्मिताताई वाहक जळगाव शहराचे लाडके आमदार श्री राजू मामा भोळे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते तसेच महानगर जिल्हाध्यक्ष सौ उज्वला बेंडाळे अनुसूचित जातीचे सरचिटणीस ज्योती निंभोरे ग्रामीण जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज तसेच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व संघटक राधेश्याम चौधरी भाजयुमचे सरचिटणीस रोहित सोनवणे समाजसेवक अतुल बारी नगरसेवक सुरेश सोनवणे विजय पाटील भाजपाचे योगिता मालवी मुंदडे हायस्कूलचे मुख्याध्यापक डीएस कुमावत सर ग्रामविकास विद्यालयाचे मुख्याध्यापक पंकज जोगी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच या यशस्वी कार्यक्रमाचे आयोजक भारतीय जनता पार्टीचे आशिष सपकाळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विशाल पवार सर सोबत इस्माईल खाटीक हरी ओम सूर्यवंशी शिवकुमार पुरोहित राजू डोंगरे प्रथमेश जोशी निलेश परदेशी कमलेश डांबरे पवन सपकाळे तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









