भारतीय डाक विभागात विमा प्रतिनिधी पदाची भरती; 05 फेब्रुवारी रोजी होणार मुलाखत .

जळगाव, दि. 23 जिमाका) – भारतीय डाक विभागात डाक जीवन विमा तसेच ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेअंतर्गत विविध विना योजनांच्या विक्रीसाठी अधीक्षक डाकघर जळगाव विभाग जळगाव -४२५००१ यांच्यामार्फत थेट मुलाखतीद्वारे विमा प्रतिनिधींची नेमणूक निवड करण्यात येणार आहे. उमेदवाराचे वय वय १८ वर्षे पूर्ण असावे. उमेदवार १० वी पास/ मान्यताप्राप्त मंडळाद्वारे समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा. इच्छुक उमेदवारास विमा पॉलीसी विक्रीचा अनुभव , स्थानिक भागाची पूर्णतः माहिती असावी. बेरोजगार तरुण/तरुणी, स्वयंरोजगार करणारे पुरुष व महिला, कोणताही कंपनीचे माजी विमा प्रतिनिधी, माजी विमा सल्‌लागार, अंगणवाडी सेविका, बचत गटातील महिला, माजी सैनिक, ग्रामपंचायत सदस्य, स्वयंसेवी संघटना चालक, किंवा वरील पात्रता असणारे सर्व इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.

ही निवड तात्पुरत्या स्वरुपाची असून विमा प्रतिनिधींच्या निवडीबाबत आणि थेट मुलाखतीबाबतचे सर्व अधिकार अधीक्षक डाकघर जळगाव विभाग जळगाव यांचेकडे राखीव असणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज, आधार कार्ड, PAN कार्ड, जन्म तारखेचा पुरावा, शैक्षणिक प्रमाणपत्र, फोटो व अन्य सबंधित दस्तऐवज सोबत जोडून दिनांक 05 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी ११ ते ०३ या वेळेत अधीक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव, पांडे चौक, पहिला मजला, मुख्य डाकघर जळगाव ४२५००१ (फोन.न. 02588-2224288, Mobile-9822050189) येथे प्रत्यक्ष उपस्थित राहावे असे आवाहन डाकघर अधीक्षकांनी केले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.