रात्र वैरीण ठरली, घराकडे निघालेल्या तरुणाचा काळ बनली, अवघ्या वीस वर्षातच तरूणाची प्राणज्योत मालवली

असं म्हणतात की, काळ आणि वेळ कधी सांगून येत नाही. परंतु अवेळी येणाऱ्या मृत्युसारखी दुर्दैवी बाब दुसरी असू शकत नाही. ज्याने आपलं आयुष्य पूर्ण बघितलेलंही नाही अशा २० वर्षीय युवकाचा अपघाती मृत्यू झाला. हाता-तोंडाशी आलेला घास काळाने हिरावल्याने वळवी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.नवापूर तालुक्यातील विसरवाडी-खांडबारा रस्त्यावर खातगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाने गावाकडे परतणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने २० वर्षीय युवकाचा डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि अधिक रक्तस्त्रावामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २० जानेवारी रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.असं म्हणतात की, काळ आणि वेळ कधी सांगून येत नाही. परंतु अवेळी येणाऱ्या मृत्युसारखी दुर्दैवी बाब दुसरी असू शकत नाही. ज्याने आपलं आयुष्य पूर्ण बघितलेलंही नाही अशा २० वर्षीय युवकाचा अपघाती मृत्यू झाला. हाता-तोंडाशी आलेला घास काळाने हिरावल्याने वळवी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
विसरवाडी खांडबारा-रस्त्यावर खातगाव फाट्याजवळ दि.२० जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आर्यन पायल्या वळवी (वय २०) रा. तलावीपाडा ता. नवापूर हा युवक दुचाकीने (क्र.एम.एच.३९ ए.एच.७३७०) विसरवाडीहून खांडबाराच्या दिशेने त्याच्या गावी जात होता.खातगाव फाट्याजवळ समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात आर्यन वळवी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अधिक रक्तस्त्रावामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.अपघातानंतर विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर बोरसे, लिनेश पाडवी, विजय चौधरी, विश्वनाथ नाईक, पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेला पाचारण केले. मात्र, तोपर्यत आर्यनचा जागीच मृत्यू झाला होता. मृत आर्यनचा मृतदेह विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या अपघातात मयत युवकाची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तलावीपाडा येथील नातेवाईकांना कळविले.
नातेवाईकांनी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात विनोद चौरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास सपोउनि नरेंद्र वळवी करीत आहे. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.