मायलेकानं बापाला संपवलं, आधी टॉवेलने आवळला गळा, नंतर मृतदेह पोत्यात भरला अन्.

रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास मुकेश हे मद्यधुंद अवस्थेत घरी आले. त्यांनी उर्मिला व मुलाला शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यानंतर ते घराबाहेर गेले. दारू पिऊन पुन्हा घरी परतले.पत्नीने अल्पवयीन मुलाच्या मदतीने पतीची टॉवेलने गळा आवळूल हत्या केली. ही थरारक घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इंगोलेनगर येथे घडली. हुडकेश्वर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून महिलेला अटक केली. पोलिसांनी तिच्या १६वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.मुकेश (वय ५७) असे मृतकाचे तर त्याची पत्नी उर्मिला असे अटकेतील महिलेचे नाव आहे. मुकेश हा हार्डवेअरच्या दुकानात काम करायचा. तो नेहमी शिवीगाळ करून मारहाण करायचा, असे उर्मिला हिचे म्हणणे आहे. रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास मुकेश हे मद्यधुंद अवस्थेत घरी आले. त्यांनी उर्मिला व मुलाला शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यानंतर ते घराबाहेर गेले. दारू पिऊन पुन्हा घरी परतले. यावेळी उर्मिला व तिचा मुलगा हे दोघे जेवण करीत होते. मुकेश यांनी त्या दोघांना पुन्हा शिवीगाळ केली, असेही उर्मिलाने पोलिसांना सांगितले.
मुलाने त्यांना धक्काबुक्की केली. वाद विकोपाला गेला. मुलाने मुकेश यांना धक्का दिला. मुकेश हे खाली पडले. त्यांच्या तोंडातून रक्त निघायला लागले. त्यानंतर मुलाने टॉवेलने गळा आवळून मुकेश यांचा खून केला. त्यानंतर उर्मिला व मुलाने जमिनीवरील रक्ताचे डाग पुसले. मुकेशचा मृतदेह पोत्यात भरून ते पोते शिवले. मृतदेह तसाच घरात ठेवला.’मृतदेह नाल्यात फेकण्यासाठी मित्राची मदत घे’, असे उर्मिलाने मुलाला सांगितले. मुलगा रात्री ११.३० वाजताच्या सुमारास मित्राच्या घरी गेला. ‘मी वडिलांचा खून केला आहे. मृतदेह पोत्यात ठेवला आहे. मृतदेह नाल्यात फेकण्यासाठी माझी मदत कर’, असे तो मित्राला म्हणाला. मुलाचा मित्र घाबरला. ‘तूही जेलमध्ये जाशील व मलाही जेलमध्ये पाठवशील’, असे तो मुलाला म्हणाला. त्यानंतर मुलाला घेऊन तो हुडकेश्वर पोलिस ठाण्यात आला. ‘मी वडिलांची हत्या केली आहे’, असे मुलाने सांगितले. मुलाचे वय बघता सुरुवातीला पोलिसांचा विश्वास बसला नाही. घटनेची शहानिशा करण्यासाठी पोलिस मुलासह घरी गेले असता पोत्यात मुकेश यांचा मृतदेह आढळला. पंचनामा करून पोलिसांनी मुकेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकलमध्ये रवाना केला. खुनाचा गुन्हा दाखल करून उर्मिलाला अटक केली. तिच्या मुलाला ताब्यात घेतले
  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.