क्रूझर व दुचाकीच्या भीषण अपघात; चाळीसगावची महिला ठार, सहा जण जखमी.

 अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढतं दिसताना दिसत असून अशातच क्रूझर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिला जागीच ठार तर सहा जण जखमी झाले. ही घटना धुळे-सोलापूर महामार्ग क्रमांक २११ वर चाळीसगाव शहरालगत रांजणगाव फाट्यावर घडली. चंदाबाई मलखान पवार (वय ७०) रा. कोंगानगर ता. चाळीसगाव असे मृत महिलेचे नाव आहे. चाळीसगाव तालुक्यातील खेडें तांडा येथील कृष्णा संजय जाधव हा रविवारी दुपारी मोटारसायकल क्र. एमएच १९ एएस ८४७३ वर त्याची आजी चंदाबाई पवार यांना घेवून चाळीसगाव कडे येत होता. तेव्हा रांजणगाव फाट्यावर चाळीसगावकडून छत्रपती संभाजीनगर कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या क्रूझरची (एमएच २० सीएच ६५२२) व दुचाकी समोरासमोर धडक झाल्याने मोटारसायकलवरील चंदाबाई पवार यांचा जागीच मृत्यू झाला.

तर मोटारसायकल चालक कृष्णा जाधव याच्यासह क्रूझर मधील चालक व प्रवासी असे सहा जण जखमी झाले आहेत. ही धडक इतकी भीषण होती की या धडकेत क्क्रुझर वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन उलटले. अपघातानंतर परिसरातील ग्रामस्थ व वाहन चालकांनी मदतीसाठी धाव घेत जखमींना उपचारासाठी रूग्णालयात हलवले. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रात्री उशिरापर्यंत चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.