नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची नियुक्ती झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची नियुक्ती झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीतदादा मोरे,लाडकी बहिण योजनेचे अध्यक्ष भरतभाऊ गावित, , महिला जिल्हाध्यक्ष सीमाताई सोनगरे यांनी शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशन स्थळी मंत्री कोकाटे यांची भेट घेतली. तसेच पुष्पगुच्छ देण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यावर नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जवाबदारी देण्यात यावी , अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे करण्यात आली होती.

त्याची दखल घेण्यात आली.शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री तथा राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री माणिकराव कोकटे यांच्यावर पालकमंत्रिपदाची जवाबदारी देण्यात आल्याने पक्ष संघटन वाढीस मदत होणार आहे. तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी विविध योजना राबवण्यासाठी पाठपुरावा करू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजितदादा मोरे यांनी सांगितले. 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनी नंदुरबार शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा मेळावा घेण्यात येणार असून त्यासाठी तयारी करण्यात येत आहे, असे डॉ मोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. मदर टेरेसा हायस्कूलच्या प्रांगणात 26 जानेवारी रोजी दुपारी मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात पक्ष संघटन, येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणूकासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांचा हृदय सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती डॉ अभिजितदादा मोरे यांनी दिली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.