बंद घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न फसला ; नागरीकांच्या सतर्कतेने भडगांव पोलिसांना यश.

शहरातील बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका अट्टल चोरटयास पकडण्यात नागरीकांच्या सहकार्याने भडगाव पोलिसांना यश आले असून आरोपी सराईत गुन्हेगार आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास सोमवार पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.शहरातील भवानी बाग परीसरातील रामकृष्ण नगर रहिवाशी आत्माराम चिंधा पाटील हे आपल्या पत्नीसह मुलीकडे बाहेर गावी गेले होते.

आत्माराम पाटील यांचे घर बंद असल्याने प्रविण संभाजी पाटील (वय ३५, रा. बाम्हणे ता. एरंडोल), विभोर जुलाल जाधव (रा. हिगोणे, जवखेडे या. एरंडोल) या दोघे चोरट्यांनी दि. १७ जानेवारी रोजी ३ वाजेच्या सुमारास बंद घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी या घरासमोरील रहिवाशी संदीप भास्कर मराठे (मुगटीकर), यांच्या लक्षात हा प्रकार आला असता त्यांनी काॅलनीतील इतर रहिवाशी जागृत करून हा प्रकार सांगितला.यावेळी झालेल्या आवाजाने चोरट्यांनी त्यांच्या ताब्यातील काळ्या रंगाची होन्डा शाहीन मोटार सायकल क्रमांक एम. एच. १९- डी.ए. ८३८६ घेऊन पेठ चौफुलीकडे पळ काढला. यावेळी संदीप भास्कर मराठे यांनी पेठ चौफुलीवर थांबलेले आपल्या काही मित्रांना व पोलीस स्टेशनला हा प्रकार सांगितला. यावेळी संदीप मराठे, हर्षल लालसिग पाटील, रात्री गस्तीवर असलेले पीएसआय किशोर पाटील, एएसआय चालक राजेंद्र पाटील यांनी या चोरट्यांचा पाठलाग करुन पेठ चौफुलीवर दोन चोरट्यांपैकी प्रविण संभाजी पाटील (वय ३५, रा. बाम्हणे ता. एरंडोल) यास पकडण्यात यश आले.
तर दुसरा चोरटा विभोर जुलाल जाधव (रा. हिगोणे, जवखेडे या. एरंडोल) हा पळवुन जाण्यात यशस्वी ठरला आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. प्रविण संभाजी पाटील आणि विभोर जुलाल जाधव या दोघे चोरट्याविरुद्ध पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता नुसार ३३१ (४), ३०५(अ), ६२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रविण संभाजी पाटील यास पाचोरा न्यायालयात हजर केले असता सोमवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून पुढील तपास पो. हे काँ. विजय जाधव हे करीत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.