धरणगाव शहरात महिला प्रसाधनगृहाची मागणी.

धरणगाव शहरात महिला प्रसाधनगृहाची मागणी अन्यथा.. राष्ट्रवादी (श.प.)काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन..

धरणगाव तालुका प्रतिनिधी – राजु बाविस्कर

धरणगाव : येथील हनुमान नगर परिसरातील रहिवासी कुसुमबाई अशोक ठाकूर यांनी नगरपरिषद, तहसिलदार, जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांना पोस्टाद्वारे निवेदन सादर करत कोट बाजार, धरणी बाजार, आठवडे बाजार परिसरात महिलांसाठी सार्वजनिक प्रसाधनगृह ची मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दररोज सकाळी कोट बाजार परिसरात भाजीपाल्याचा लिलाव होतो. तद्नंतर कोट बाजार, धरणी बाजार, आठवडे बाजार व शहरातील विविध शॉपिंग कॉम्प्लेक्स परिसरात भाजीपाला, हातगाडी, फळविक्री अश्या ठिकाणी विविध व्यवसाय केले जातात. याठिकाणी व्यावसायिक पुरुष व महिला दोघे असून देखील फक्त पुरुषांसाठी प्रसाधनगृहाची सोय आहे. मात्र महिलांसाठी नाही ही अतिशय गंभीर बाब आहे. खरं म्हणजे देशात सर्वच पदावर आज महिला कारभार सांभाळत आहेत एवढंच नाही तर देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु या देखील एक महिला आहेत. असं असतांना धरणगाव या तालुक्याच्या ठिकाणी महिलांची जर अशा प्रकारे गैरसोय होत असेल तर ही खेदाची बाब आहे. धरणगाव शहर हे जवळपास पन्नास हजार लोकसंख्या असलेले शहर आहे. धरणगाव हे तालुक्याचे ठिकाण असून शहरात कामानिमित्त येणाऱ्या तालुका परिसरातील महिला भगिनींची वर्दळ बघता महिलांसाठी मुतारी व शौचालय नाही. गावातील कोट बाजार, धरणी बाजार यांसह विविध शॉपिंग कॉप्लेक्स असलेल्या परिसरात महिलांसाठी प्रसाधनगृहाची सोय लवकरात लवकर करण्यात यावी. याबाबतची मागणी पोस्टल निवेदनाद्वारे कुसुमबाई ठाकुर यांनी केली आहे.

दिलेल्या निवेदनात नमूद केलेल्या मागणीची लवकरात लवकर दखल घेऊन शासन स्तरावर या प्रश्नाची कायमस्वरूपी सोडवणूक करण्यात यावी अन्यथा संघटित आंदोलन उभे करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी दिला आहे.

  • Related Posts

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने त्याने एका कंटेनरला भीषण धडक दिली. या अपघातात दोघांचा अत्यंत भयावह असा अंत झाला आहे. या घटनेने मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर काही वेळ वाहतूक खोळंबली होती. शिरपूर…

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    वाघोली येथील केसनंद इथं पोटाची खळगी भरण्यासाठी अमरावतीहून आलेल्या आणि दमून भागून रस्त्याच्या कडेला झोपलेल्या कामगारांना काळ बनून आलेल्या मद्यधुंद डंपर चालकाने अक्षरशः चिरडलं.तुम्ही गरीब असाल, तुमच्या डोक्यावर छत नसेल…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    दुचाकीला कारची भीषण धडक, पती-पत्नी रस्त्यावर पडले अन् साता जन्माची साथ सुटली

    दुचाकीला कारची भीषण धडक, पती-पत्नी रस्त्यावर पडले अन् साता जन्माची साथ सुटली

    दुर्दैवी! मोठ्या आवाजात गाणे ऐकण्याच्या नादात पिकअप चालकाने ३ वर्षीय मुलाला चिरडले.

    दुर्दैवी! मोठ्या आवाजात गाणे ऐकण्याच्या नादात पिकअप चालकाने ३ वर्षीय मुलाला चिरडले.

    चंद्रपूर जिल्हा बँक परीक्षेत डमी परीक्षार्थी? विद्यार्थ्यांचा संताप, पोलिस आले अन् तोतया विद्यार्थी पसार!

    चंद्रपूर जिल्हा बँक परीक्षेत डमी परीक्षार्थी? विद्यार्थ्यांचा संताप, पोलिस आले अन् तोतया विद्यार्थी पसार!