नारायणगाव येथे झालेल्या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये एका शिक्षिकेचाही समावेश होता.पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. यात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वडगाव कांदळी ते १४ नंबर या भागातून काही प्रवासी खाजगी गाडीने नारायणगावच्या दिशेने निघाले होते. मात्र, प्रवासी वाहतूक करणाऱ्या या गाडीला आयशर कंपनीच्या वाहनाने जोरात धडक दिली. त्यामुळे प्रवासी वाहतूक करणारी गाडी समोर थांबलेल्या एसटी बसला जाऊन धडकली. या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून मृतांमध्ये एका शिक्षिकेचा देखील समावेश आहे. या शिक्षिकेला निवृत्तीसाठी अवघे दोन वर्ष बाकी होते. मात्र, या अपघाताने या शिक्षिका निवृत्त होण्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. या घटनेने शिक्षिकेच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.











