शेतीच्या पैशावरुन वाद, चुलत भावावर अन् त्याच्या पत्नीवर बाजारात कुऱ्हाडीने वार; भावाची हत्या.

 माटरगाव येथील आठवडी बाजारात दुपारी सख्ख्या चुलत भावाचा कुऱ्हाडीने खून करून फरार झालेला आरोपी सोपान मिरगे याला जलब पोलिसांनी अवघ्या सहा तासातच शेगाव येथून पकडले असून त्याला अटक केली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर येत माटरगाव येथील आठवडी बाजारात झालेल्या घटनास्थळाला तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे आणि डीवायएसपी विनोद ठाकरे यांनी भेट दिली असून पाहणी केली.बुलढाणा जिल्ह्यातील जलब तालुक्यात जीवगाव प्रकल्पात केलेल्या शेतीच्या पैशाच्या वादावरून माटरगाव येथील भर आठवडी बाजारात सख्ख्या चुलत भावाने चुलत भावाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून निर्गुण खून केला. सदर घटना ही १७ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास माटरगाव येथील आठवडी बाजारात घडली. याबाबत सविस्तर घटनाक्रम असा की शेगाव तालुक्यातील भासतन रहिवासी शत्रुघन श्रीराम मिरगे (वय ४०) यांचा जीवगाव प्रकल्पात केलेल्या शेतीच्या पैशावरून चुलत भावासोबत वाद सुरू होता.
दरम्यान, १७ जानेवारी रोजी त्यांचा सख्खा चुलत भाऊ सोपान सदाशिव मिरगे (वय ३८) याने माटरगाव येथील भर आठवडी बाजारामध्ये रस्त्यावर दुपारच्या सुमारास शत्रुघन मिरगे यांच्या डोक्यावर कुराडीने वार करून त्यांचा खून केला. तर त्याची साली मोनाली भागवत चेंदाणे रा. अकोला आणि पत्नी तृप्ती शत्रुघन मिरगे यांच्यावर सुद्धा कुऱ्हाडीने वार केल्यामुळे त्या दोघी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खामगाव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जीवगाव प्रकल्पात मिळालेल्या पैशांच्या वादामुळे चुलत भावामध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होता.याबाबत दोन्ही गटांकडून जलब व खामगाव पोलीस स्टेशनला परस्परविरोधात तक्रारी सुद्धा दाखल केली असल्याचं देखील समजतं. तर या घडलेल्या घटनेची माहिती समजतात जलब पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल सांगळे व पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले व गंभीर जखमी असलेल्या मोनालीला पोलिसांच्या गाडीमध्येच पुढील उपचारासाठी खामगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतकाचे शवविच्छेदन करण्यासाठी खामगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. या घटनेतील फरार आरोपीला पकडण्यासाठी जलब पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल सांगळे यांनी पोलिसांचे पथक रवाना करून शेगाव इथून आरोपीला अटक केली.माटरगाव येथील आठवडी बाजारात दुपारी सख्ख्या चुलत भावाचा कुऱ्हाडीने खून करून फरार झालेला आरोपी सोपान मिरगे याला जलब पोलिसांनी अवघ्या सहा तासातच शेगाव येथून पकडले असून त्याला अटक केली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर येत माटरगाव येथील आठवडी बाजारात झालेल्या घटनास्थळाला तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे आणि डीवायएसपी विनोद ठाकरे यांनी भेट दिली असून पाहणी केली.
  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.