भरधाव कंटेनरची २० वाहनांना धडक, असा पळवला कंटेनर; पुण्यातील अपघाताचा थरारक घटनाक्रम

संतप्त नागरिकांनी कंटेनरचालकाला बेदम चोप दिला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी चालकाला ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले. पोलिस उपायुक्त शिवाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी हा पाठलाग केला. संबंधित कंटेनरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चाकण-शिक्रापूर रस्त्यावर गुरुवारी (१६ जानेवारी) दुपारी एकच्या सुमारास भरधाव कंटेनरने १५ ते २० वाहनांना धडक दिली. भरधाव कंटेनर चाकणहून शिक्रापूरपर्यंत वाहने उडवत गेला. या घटनेत एक पाच वर्षांची मुलगी आणि पोलिस कर्मचाऱ्यासह काही जण गंभीर जखमी झाले असून, अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहेअब्दुल रझाक असे कंटेनर चालकाचे नाव आहे. गुडगाव येथील चेतक लॉजिस्टिक येथे तो चालक म्हणून काम करतो. त्याने सुरुवातीला चाकण येथे एका दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवरील तिघे जण रस्त्यावर कोसळले. यामध्ये एका पाच वर्षीय मुलीला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर कंटेनरचालकाने पोलिसांच्या वाहनालाही धडक देऊन कंटेनर सुसाट वेगाने पुढे नेला. या घटनेची माहिती मिळताच चाकण पोलिसांनी कंटेनरचा पाठलाग सुरू केला.
कंटेनरचालकाने पिंपळे-जगताप, चौफुला व शेलपिंपळगाव हद्दीत १५ ते २० वाहनांना धडक दिली. यामध्ये दुचाकी, चारचाकी आणि मालवाहू वाहनांचे मोठे नुकसान झाले. चौफुला परिसरात एका छोट्या मालवाहू वाहनाला आणि कारला जोरदार धडक बसल्याने त्या वाहनांचा चुराडा झाला. या कंटेनरला पकडण्यासाठी सुमारे ३० ते ४० दुचाकीस्वार पाठलाग करीत होते. अखेर जातेगाव हद्दीत कंटेनर थांबवण्यात यश आले.संतप्त नागरिकांनी कंटेनरचालकाला बेदम चोप दिला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी चालकाला ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले. पोलिस उपायुक्त शिवाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी हा पाठलाग केला. संबंधित कंटेनरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कंटेनरचालक रस्त्यात येणाऱ्या लहान-मोठ्या वाहनांना धडक देऊन वेगाने कंटेनर पळवत होता. या परिस्थितीत काही तरुणांनी दुचाकीवरून कंटेनरचा पाठलाग सुरू केला. जीवाची पर्वा न करता हे तरुण कंटेनर थांबविण्याचा प्रयत्न करीत होते. शेवटी जातेगाव हद्दीत कंटेनर थांबविण्यास तरुणांना आणि पोलिसांना यश आले.कंटेनर चाकण चौकातून शिक्रापूर रस्त्याने जात होता. सुरुवातीला त्याने दुचाकीला धडक दिली.त्यानंतर चालकाने भरधाव कंटेनर चालविण्यास सुरुवात केली.साबळेवाडी ते बहुळ परिसरात दोनवेळा कंटेनर चालकाने यू-टर्न मारला.जातेगाव हद्दीत शिक्रापूर पोलिसांनी रस्त्यावर दोन मोठे डंपर आडवे लावले.कंटेनरचालकाने या डंपरला धडक दिल्यानंतर कंटेनर थांबला.
  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.