पं. दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात संपन्न ; ४६ उमेदवारांची अंतिम निवड.

पं. दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात संपन्न ; ४६ उमेदवारांची अंतिम निवड.
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जळगाव व कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपासून “पं. दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन पदवी प्रदान सभागृह, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे करण्यात आले होते. या मेळाव्याला जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू श्री माहेश्वरी, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त संदीप गायकवाड हे उपस्थित होते.

या मेळाव्या करिता नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे येथील उद्योजक व आस्थापनांनी सहभाग नोंदवला होता तसेब उत्कर्ष स्मॉल फायनान्स बैंक, जळगाव, गोविंदा एचआर सर्विसेस नाशिक हिताची इष्टिमो ब्रेक सिस्टीम्स जळगाव स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल्स किरण मशीन टूल्स डाटा मेटिक ग्लोबल सर्विसेस इत्यादी ३५ आस्थापनांनी २१०० पेक्षा जास्त रिक्त पदे अधिसूचित केली होती, मेळाव्याला ऑनलाईन नोंदणी केलेले १९४४ केलेली होती व ऑफलाईन नोंदणी केलेले ७४१ उमेदवार उपस्थित होते त्यापैकी एकुण १२७४ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. मुलाखती दिलेल्या उमेदवारांपैकी एकुण ३९५ उमेदवारांची प्राथमिक निवड तसेच ४६ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली आहे.

मेळाव्याचे प्रास्ताविक करताना श्री संदीप गायकवाड सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यानी रोजगार मेळाव्याचा उद्देश व उपलब्ध रिक्त पदांबाबत उपस्थितांना माहिती दिली तसेच विभागाच्या विविध योजनांबाबत माहिती दिली. मेळाव्यामध्ये उपलब्ध असलेल्या रिक्त पदाचा लाभ जास्तीत जास्त उमेदवारांनी घ्यावा असे आवाहन जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार माननीय रिसताताई वाघ यांनी केले. याप्रसंगी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू श्री माहेश्वरी यानी मेळाव्याच्या आयोजनामागील विद्यापीठाची भूमिका तसेच अशाच प्रकारचे मेळावे धुळे, नंदुरबार तसेच जळगाव जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये करण्यात येणार असल्याचे सांगितले व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.