कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांव यांच्या वतीने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन संपन्न. जळगांव. आज दि.17/1/2024 रोजी कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य वतीने व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचानालय मुबई संचालक सतीश सुर्यवंशी साहेब यांच्या आदेशनवये तसेच जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी संतोष साळुंखे मार्गदर्शनाखाली कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांव
व जिल्हातील सर्व आय टी आय यांच्या सहभागातून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगांव प्रांगणात आयोजित जिल्हा क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन डॉ सुहास गाजरे प्राचार्य अभियांत्रिकी महाविद्यालय जळगांव यांनी केले प्रसंगी एम एस राजपूत , शिवकुमार जुमनाके प्राचार्य आय टी आय भुसावळ/पाचोरा तसेच सस्थेच्या उपप्राचार्य राजश्री पाटील उपस्थीत होते. गट निदेशक नितीन चौधरी यांनी प्रस्तावना केली. सूत्रसंचलन महेश सुर्यवंशी यांनी केले. एल पी धांडे, डी डी देवरे, एम पी पाटील, सि वि घोडके, एस आर बोरोले व सर्व शिल्पनिदेशक , कार्यालयीन कर्मचारी, व सर्व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत आभार एन एस एस कार्यक्रम कार्यक्रम अधिकारी रमेश सपकाळ यांनी मानले









