प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न.

प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल अंतर्गत प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी अमळनेर येथील पिंपळे तालूक्यातील अनुदानित आश्रम शाळेत संपन्न झाला. या प्रदर्शनात 17 शासकीय व 34 अनुदानित आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण व सर्जनशील उपकरणे सादर केली. यावेळी उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक असे तीन गट तयार करण्यात आले होते ज्यात चार बीटमधून प्रत्येक गटातील सर्वोत्तम तीन उपकरणांना प्रदर्शनासाठी निवडण्यात आले. या प्रदर्शनात अनुक्रमे 14, 12 आणि 26 उपकरणांचा सहभाग होता.

या कार्यक्रमाचे उद्घाटन यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या हस्ते झाले. उद्घाटनपर भाषणात अरुण पवार यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्याचे महत्त्व पटवून दिले आणि प्रयोगशीलता व नाविन्यपूर्णतेला चालना देण्याचे आवाहन केले. प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शनातील विजेत्या विद्यार्थ्यांना इस्रो दौऱ्यावर नेले जाईल असे त्यांनी जाहिर केले.समारोप व बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्षस्थान माननीय अनिल झोपे, प्राचार्य, डायट जळगाव यांनी भूषवले. यावेळी अनिल झोपे यांनी डायट जळगावच्या वतीने आदिवासी आश्रम शाळांसाठी शैक्षणिक मदत व सुधारणा यासाठी कायमस्वरूपी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तीनही गटातील प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या शाळांना स्टेट बँक ऑफ इंडिया, यावल यांच्या वतीने इन्सिनरेटर भेट देण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय स्टेट बँकचे क्षेत्रीय व्यवस्थापक धर्मेंद्र कुमार सिंग यावलचे शाखा व्यवस्थापक राधेश्याम ताराचंद मूंगमुळे, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. सी. डी. साळुंखे, विद्या पाटील, युवराज पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे निरीक्षण व मूल्यांकन कार्य विज्ञान शिक्षक निरंजन पेंढारे, बी. बी. ठाकरे व डी. के. पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहा प्रकल्प अधिकारी पवन पाटील व इतर अधिकारी व कर्मचारी शिक्षण विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल व अनुदानित आश्रम शाळा, पिंपळे यांच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.