एकटीला गाठत दिरानेच केली हद्द पार, ‘व्हिडीओ’ दाखवून पतीही करायचा अनैसर्गिक अत्याचार, अखेर.

पती व दीर या दोघांपासून वारंवार होणारा अत्याचार असहाय्य झल्याने, पीडितेने महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात धाव घेऊन दीर ,पती, या दोघांसह त्यांना साथ देणाऱ्या सासू आणि नणंदवरही, भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली आहे.वाहिनीवर दिराने राहत्या घरात बलात्कार केल्याची घटना समोर अली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडितेचा पतीही मोबाईल मधील अश्लिल व्हिडीओ दाखवून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करायचा. अखेर पती व दीर या दोघांपासून वारंवार होणारा अत्याचार असहाय्य झल्याने, पीडितेने महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात धाव घेऊन दीर ,पती, या दोघांसह त्यांना साथ देणाऱ्या सासू आणि नणंदवरही, भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ३० वर्षीय महिला ही मुंब्रा भागात राहणारी असून तिचा विवाह कल्याण पश्चिम भागातील जोशीबाग भागात राहणाऱ्या तरुणाशी मे २०१४ रोजी थाटात झाला होता. त्यानंतर २०२२ पर्यत सुखानं संसार सुरू असतानाच पीडितेचा पती रात्री घरी आल्यावर तिला अश्लिल व्हिडीओ दाखवून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत होता. यावरून दोधांमध्ये वादही झाले. शिवाय सासू व नणंद यांनाही पती करत असलेल्या घृणास्पद कृत्याची माहिती दिली. मात्र पती असल्याने तो काही करणार म्हणून तिलाच शिवीगाळ आणि मारहाण केल्याचे पीडित पत्नीने तक्रारीत नमूद केलं आहे. खळबळजनक बाब म्हणजे पतीचे बाहेर देखील इतर स्त्रियांशी प्रेमप्रकरण असल्याचे समजले. त्यावेळी सदर बाबत पतीस विचारणा केली असता त्याने पीडित पत्नीला बेदम मारहाण केली. असे पीडित पत्नीने तक्रारीत नमूद केलं आहे.
दुसरीकडे पतीचे कुटूंब एका कार्यक्रमानिमीत्ताने घराबाहेर गेले असता, पीडिता घरी एकटी होती. याच संधीचा फायदा घेऊन विवाहित असलेल्या दिराने पीडितेशी लगट करत अश्लील चाळे केले. त्यानंतर या घटनेची माहिती पती व सासूला दिली असता, उलट पीडितेलाच दोघांनी मारहाण करत शिवीगाळ केली. त्यामुळं दिराची हिंमत वाढली होती. त्यानंतर पुन्हा पीडिता घरात एकटीच असताना दिराने, २० डिसेंबर २०२४ रोजी बलात्कार केल्याचं तक्रारीत नमूद केलं आहे.दरम्यान, पती व दिराच्या तसेच सासू व नणंदेच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिच्यावर घडलेल्या घटनांचे कथन करताच, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ६४ (१) ७५ ७४ ८५ ३५२ ३ (५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्याशी संपर्क साधला असता, पीडित महिलेच्या तक्रारीवरून दिरावर अत्याचाराचा तर पतीवरही अनैसर्गिक अत्याचार, व सासू आणि नणंदेवर मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली असून, चौकशी अंतीच आरोपीवर कारवाई केली जाणार असल्याचेही सांगितले आहे.
  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.