सळई वाहतूकीचा चालक ताब्यात; तिघांवर गुन्हा.

द्वारका भागात उड्डाणपुलावर  लोखंडी सळईंनी (लोखंडी गज) भरलेला ट्रक आणि टेम्पोचा भीषण अपघात रविवारी (ता. १२) घडला होता. अपघात घडताच ट्रकचालक फरारी झाला होता. भद्रकाली गुन्हेशोध पथकाने त्यास नाशिकरोड येथून ताब्यात घेतले. त्यास न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या अपघातातील मृतांची एकूण संख्या सात झाली असून जखमींच्या प्रकृतित सुधारणा हाेत आहे.

धुळ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील अय्यप्पा मंदिरासमाेरील द्वारका चौक उड्डाणपुलावरील पथदीप क्रमांक ७९ येथे रविवारी सायंकाळी अपघात झाला हाेता. सळईंनी भरलेला आयशर ट्रक (एमएच २५ यू ०५०८) व टेम्पो (एमएच १५ एफव्ही ५६०१ दोन्ही वाहने धुळ्याकडून मुंबईच्या दिशेने जात होती. द्वारका चौकातील उड्डाणपुलावर आयशर ट्रकवर मागून येणारा टेम्पो जोरदार आढळला. अपघातात ट्रकमधील सळई टेम्पोतून समाेर बसलेल्या अतुल मंडलिक, चेतन पवार, दर्शन घरत, यश खरात, संतोष मंडलिक, विद्यानंद कांबळे, अनुज सुनील घरटे यांच्या शरीरात व डाेक्यात शिरल्याने त्यांचा मृत्यू झाला.अपघातानंतर  काही वेळातच ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला होता.

रात्री उशिरा पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक समीर निसार शहा याच्यासह ट्रकमालक अशोककुमार दुर्गानंद यादव (वय ४१, रा. चुंचाळे शिवार, अंबड), तसेच लोखंडी सळई भरून देणारा मनोजकुमार मेहरचंद दिमान (४५, रा. रवींद्र हायस्कूलजवळ, द्वारका) अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यातील ट्रकमालक आणि सळई भरून देणारा दोघांना रविवारी रात्री ताब्यात घेतले होते. ट्रकचालक मात्र फरारी झाला होता.दरम्यान, त्यानंतर भद्रकाली गुन्हे शाखेने  त्याचा माग काढत नाशिक रोड येथील चेहडी भागातून सोमवारी (ता. १३) रात्री उशिरा ताब्यात घेतले. त्यास न्यायालयात हजर केले. ट्रकमालक आणि सळई भरून देणारा दोघांना बुधवार (ता. १५) पर्यंत, तर ट्रकचालकास गुरुवार (ता. १६) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस निरीक्षक विक्रम मोहिते पुढील तपास करीत आहेत. 

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.