जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया तर्फे स्व.खाशाबा जाधव जयंती व राज्य क्रीडा दिन साजरा.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया तर्फे स्व.खाशाबा जाधव जयंती व राज्य क्रीडा दिन साजरा.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल येथे राज्य क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे सचिव राजेश जाधव, क्रीडा शिक्षक महासंघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत कोल्हे, छ्त्रपती पुरस्कार्थी किशोर चौधरी, छ्त्रपती पुरस्कार्थी जयेश मोरे,

छ्त्रपती पुरस्कार्थी कू.नेहा देशमुख ,राज्य क्रीडा मार्गदर्शक मिनल थोरात, जिल्हा सेपक टकारो असोसिएशनचे सचिव प्रा.इकबाल मिर्झा, जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव  योगेश सोनवणे यांची उपस्थिती होती प्रारंभी युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद व देशाचे पहिले ऑलिंपियन पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण छ्त्रपती पुरस्कर्थी जयेश मोरे व नेहा देशमुख यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविकात जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडूंसाठी उपलब्ध क्रीडा सुविधा व खेळाडूंसाठी नव्याने होणाऱ्या सुविधा व त्याचा भविष्यात कसा उपयोग होईल,आजच्या दिवसाचे महत्व यावर सविस्तर माहिती दिली ऑलिंपियन खाशाबा जाधव यांचे बालपण, त्यांची शालेय, महाविद्यालयीन क्रीडा कारकीर्द, कराड ते ऑलिंपिक पर्यंतचा क्रीडा प्रवास त्यात आलेल्या अडचणी व त्यावर केलेली मात व त्यांचे काळातील व आजच्या काळात उपलब्ध सोयी सुविधा यावर सविस्तर माहिती दिली.

याप्रसंगी छ्त्रपती पुरस्कारर्थी जयेश मोरे व नेहा देशमुख यांचा सन्मान चिन्ह देवून विशेष सत्कार करण्यात आला उपस्थित सर्व मान्यवरांना ऑलिंपियन खाशाबा जाधव यांचे जीवन चरित्राचे पुस्तके भेट देण्यात आली. छ्त्रपती पुरस्कार्थी डॉ.सुमेध तळवलकर यास नुकतीच शारीरिक शिक्षणात विद्या वाचस्पती पदवी प्राप्त झाल्याबद्दलचा सत्कार त्याचे प्रशिक्षक किशोर चौधरी यांनी स्वीकारला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार क्रीडा अधिकारी डॉ.सुरेश थरकुडे यांनी केले कार्यक्रमास विविध खेळाचे क्रीडा प्रशिक्षक, मार्गदर्शक, संघटक व असंख्य खेळाडू यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ यांचे मोलाचे सहकार्य लाभले उपस्थित सर्वांना जिल्हा क्रीडा अधिकारी  रविंद्र नाईक यांचे हस्ते तिळगुळ देवून कार्यक्रमाची सांगता झाली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.