संतोष गवळी हत्याप्रकरणातील शार्पशूटर इम्रान कुरेशी अखेर गजाआड! घातपाताचे कारण उघडकीस

 कुरेशीवर मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमह्ये खुनाचा प्रयत्न, खून, खंडणी, टोळीयुद्ध आणि दंगली असा मोठा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. नेमबाजी कौशल्य असलेला शार्पशूटर म्हणून त्याचे वर्णन केले जात होते. कुरेशी वेगवेगळे सिम कार्ड वापरणे आणि नेहमीच्या कॉल्सऐवजी व्हॉट्सॲप कॉलवर अवलंबून राहणे यासारख्या युक्त्या वापरात असे. ३ जानेवारी रोजी झालेल्या सानपाडा गोळीबार प्रकरणातील शार्पशूटरला पुण्यातील स्थानिक पोलिसांनी मंगळवार दिनांक १४ जानेवारी रोजी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शूटर इम्रान कुरेशी एक कुख्यात गुन्हेगार आहे. आणि डीके राव टोळीचा माजी सदस्य आहे. कुरेशीकडून वापरलेले हत्यार पोलिसांनी जप्त केले आहे. पुढील तपासासाठी त्याला सानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कचरा कंत्राटदार संतोष गवळी याने राजाराम ठोके यांच्या हत्येचा कट रचला होता. गुन्हे शाखा आणि नवी मुंबई पोलीस अधिकाऱ्यांनी घेतलेल्या शोधमोहिमेनंतर गवळीला देखील पुण्यात पकडण्यात आले आहे.
गवळीचा करार संपल्यानंतर राजाराम ठोके यांना सुमारे अडीच वर्षांपूर्वी कचरा उचलण्याचे व विल्हेवाटीचे कंत्राट मिळाले होते. याचाच राग गवळी याला होता. एपीएमसी मार्केटमधील मजुर गवळीचा अनादर करत होते. मात्र ठोके यांचा सर्व आदर करत असल्याने गवळीच्या मनात राग उत्पन्न झाला होता. त्यामुळे गवळी याने कळंबोली येथील रहिवासी इम्रान मुल्ला कुरेशी या शार्प शूटरच्या मदतीने ठोकेचा खात्मा करण्याचा कट रचला. डीके राव गँगचा माजी सदस्य असलेल्या कुरेशीला गोळ्या घालण्याचे कंत्राट देण्यात आले होते.दरम्यान, नवी मुंबईतील कळंबोली येथील रहिवासी असलेल्या कुरेशीवर मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमह्ये खुनाचा प्रयत्न, खून, खंडणी, टोळीयुद्ध आणि दंगली असा मोठा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. नेमबाजी कौशल्य असलेला शार्पशूटर म्हणून त्याचे वर्णन केले जात होते. कुरेशी वेगवेगळे सिम कार्ड वापरणे आणि नेहमीच्या कॉल्सऐवजी व्हॉट्सॲप कॉलवर अवलंबून राहणे यासारख्या युक्त्या वापरात असे.
बऱ्याच वेळा, तो कॉल करायचा पण एका रिंगनंतर डिस्कनेक्ट करायचा. तो वारंवार सिमकार्ड स्विच करत असे. आणि त्याचा फोनही वारंवार बंद करत असे. त्यामुळे तपासाला विलंब झाल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. मात्र या घटनेत गोळीबार करणारा मुख्य शार्पशुटर इम्रान कुरेशी आणि हत्येची सुपारी देणारा कचरा कंत्राटदार संतोष गवळी यांचे पितळ उघडे पडले असून दोघेही जेरबंद झाल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.