जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याना त्वरित मदत मिळावी .

जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याना त्वरित मदत मिळावी  आम्ही आपणास या निवेदनाव्दारे कळवू इच्छीतो की गेल्या महिन्यात अवकाळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले असून पंचनामे करून बरेच दिवस झाले परंतु अजून पर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. आधीच खरीप हगामातील अति पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले उत्पन्न आधीच कमी आले आणि त्याही मालाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे.

रब्बी हंगामात चांगले उत्पादन घेता येईल या आशेवर असलेला शेतकरी मात्र परत अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडला आहे. आता पुन्हा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. जळगाव जिल्ह्यात काही भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बीच्या व काढणीला आलेला केळी व इतर पिकाला फटका बसला आहे. तरी आपनास आम्ही पुनश्च विनंती करतो की शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळावी. अविनाश भास्कर पाटील जळगाव जिल्हाध्यक्ष ,प्रदीप पाटील जळगाव तालुका अध्यक्ष,विलास सोनार तालुका संघटक,संदीप मांडोळे,हर्षल वाणी शहर सचिव ,देवेंद्र माळी मनोज लोहार तालुका सचिव, आपला नम्र अविनाश भास्कर पाटील जळगाव जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.