अखेर नराधम सापडला, अपघात करुन पळून गेलेला खुद्द ‘डॉक्टर’! पोलिसांनी ‘असा’ केला घटनेचा उलगडा

 रविवारी एका अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कुटीवरून जाणाऱ्या दोन तरुणींचा मृत्यु झाला होता. रस्त्यावरील बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांंमुळे पोलिसांंना शोध कार्यात अडचणी येत होत्या. परंतु, घटनास्थळी पडलेल्या गाडीच्या तुटलेल्या नंबर प्लेटचे तुकडे जुळवून त्याआधारे पोलिसांनी आरोपीचा शोध लावला आहे.स्कुटीवरील दोन तरुणींना धडक देऊन पळून गेलेला स्कॉडा चालक डॉ. अनिल बद्रिनाथ कादिया (वय ३४) याचा एपीएमसी पोलिसांनी शोध घेऊन त्याला ठाणे येथून अटक केली आहे. न्यायालयाने डॉ. कादिया याची २ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. रविवारी एका अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कुटीवरून जाणाऱ्या दोन तरुणींचा मृत्यु झाला होता. रस्त्यावरील बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांंमुळे पोलिसांंना शोध कार्यात अडचणी येत होत्या. परंतु, घटनास्थळी पडलेल्या गाडीच्या तुटलेल्या नंबर प्लेटचे तुकडे जुळवून त्याआधारे पोलिसांनी आरोपीचा शोध लावला आहे.या अपघातातील स्कॉडाचालक डॉ. कादिया हा रविवारी सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास आपल्या कारमधून वाशी येथून ठाण्याच्या दिशेने जात होता.
यावेळी तो पामबीच मार्गावरून ठाण्याच्या दिशेने जात असताना, कोपरा पुलाजवळ बोनकोडे येथे स्कुटीवरून जाणाऱ्या दोन तरुणींना त्याने जोरदार धडक दिली होती. त्यात स्कुटीचालक संस्कृती खोकलेचा जागीच, तर अंजली पांडेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.या अपघातानंतर डॉ. कादिया याने जखमी तरुणींना कुठल्याही प्रकारची मदत न करता, तसेच या अपघाताची माहिती पोलिसांना न देताच पलायन केले होते. या अपघातानंतर पळून गेलेल्या कार चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केल्यानंतर या मार्गावरील बहुतेक सीसीटीव्ही बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे या अपघातातील आरोपी कार चालकाचा शोध घेण्यात पोलिसांना बऱ्याच अडचणी आल्या.झालेल्या अपघातातील स्कॉडा कारने स्कुटीला जोरात धडक दिल्यामुळे स्कुटीवरील दोन्ही तरुणी हवेत फेकल्या गेल्या. या धडकेमुळे स्कॉडाच्या नंबरफ्लेटचे तुकडे होऊन ते रस्त्यावर पडले. पोलिसांना सीसीटीव्हीतून काहीच मदत न मिळाल्याने अखेर रस्त्यावर पडलेले स्कॉडा कारच्या नंबरप्लेटचे तुकडे एकत्र करून, त्याद्वारे नंबर जुळवून कारचा शोध घेतला. त्यानंतर सदरची स्कॉडा कार ठाण्यातील एमडी डॉक्टरची असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी रविवारी रात्री डॉ. अनिल बद्रिनाथ कादियाला ताब्यात घेतले. त्यानंतर सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले.
  • Related Posts

    जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याना त्वरित मदत मिळावी .

    जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याना त्वरित मदत मिळावी  आम्ही आपणास या निवेदनाव्दारे कळवू इच्छीतो की गेल्या महिन्यात अवकाळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले असून…

    मी पोलिसांना घाबरत नाही, महिन्याला हप्ता द्यायचा, पुण्यातील वारजेमध्ये खंडणीची धमकी देत मारहाण

    पुण्यातील वारजे परिसरात लाँड्री व्यावसायिक आणि एक उद्योजक यांना दरमहिना खंडणीची मागणी करून धमकी देण्यात आली. आरोपी ओंकार उर्फ खंड्या वाघमारेने दुकान आणि चारचाकीची तोडफोड केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    विधी सेवा महाशिबिर व शासकीय सेवा योजना महामेळाव्याचे १९ जानेवारी रोजी पाचोरा येथे आयोजन ; नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

    विधी सेवा महाशिबिर व शासकीय सेवा योजना महामेळाव्याचे १९ जानेवारी रोजी पाचोरा येथे आयोजन ; नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

    जळगावात दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थाचा मुदतबाहय साठा नष्ट ; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई.

    जळगावात दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थाचा मुदतबाहय साठा नष्ट ; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई.

    पतंग उडवतांना दुसऱ्या मजल्यावरुन पडल्याने बालक गंभीर जखमी !

    पतंग उडवतांना दुसऱ्या मजल्यावरुन पडल्याने बालक गंभीर जखमी !

    खेळामध्ये सांघिक भावना असणे खूप महत्वाचे : आ. राजूमामा भोळे

    खेळामध्ये सांघिक भावना असणे खूप महत्वाचे : आ. राजूमामा भोळे

    ‘सरपंच’पद आरक्षणासाठी ओबीसींची लोकसंख्या व टक्केवारीची माहिती मागवली

    ‘सरपंच’पद आरक्षणासाठी ओबीसींची लोकसंख्या व टक्केवारीची माहिती मागवली

    विवाहितेचा छळ करून खून; सासरच्या 5 जणांना जन्मठेप.

    विवाहितेचा छळ करून खून; सासरच्या 5 जणांना जन्मठेप.