मी पोलिसांना घाबरत नाही, महिन्याला हप्ता द्यायचा, पुण्यातील वारजेमध्ये खंडणीची धमकी देत मारहाण

पुण्यातील वारजे परिसरात लाँड्री व्यावसायिक आणि एक उद्योजक यांना दरमहिना खंडणीची मागणी करून धमकी देण्यात आली. आरोपी ओंकार उर्फ खंड्या वाघमारेने दुकान आणि चारचाकीची तोडफोड केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीच्या शोधात असून, वरिष्ठ निरीक्षकांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे.  लाँड्री व्यावसायिकाकडे दर महा पाच हजार रुपये खंडणीचा हप्ता मागून त्याच्या दुकानाची तोडफोड करणाऱ्या सराईत गुंडाविरोधात वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ‘मी या भागातील दादा आहे, मला प्रत्येक महिन्याला हप्ता दिलाच पाहिजे,’ अशी दमदाटी करून सराईताने आणखी एका उद्योजकाला मारहाण करीत त्यांच्या चारचाकीची काच फोडली.या प्रकरणी ओंकार उर्फ खंड्या वाघमारे (वय २१, रा. रामनगर, वारजे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याविरोधात लाँड्री व्यावसायिक आणि उद्योजकाने वारजे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

ही घटना १० जानेवारीला रात्री साडेआठच्या सुमारास शिवण्यातील दांगट पाटीलनगर परिसरात घडली. या भागात तक्रारदारांचे इस्त्री आणि कपडे धुलाईचे दुकान आहे. तेथे आरोपी वाघमारे गज घेऊन आला. ‘मी या भागाचा दादा आहे. मला घर बांधायचे असून, त्यासाठी आता दहा हजार रुपये आणि दरमहा पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागेल; अन्यथा डोके फोडून दुकान जाळून टाकीन, अशी धमकी त्याने लाँड्री व्यावसायिकाला दिली. त्यामुळे लाँड्री व्यावसायिकाने घाबरून त्याला थोडेफार पैसे देताच आरोपीने शिवीगाळ करून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली; तसेच दुकानाची तोडफोड केली.त्यानंतर आरोपीने लघु उद्योजकालाही मारहाण करीत शिवीगाळ केली आणि चाचाकीची काच फोडली. हप्ता न दिल्यास कारखाना पेटवून देण्याची धमकी दिली. ‘मी पोलिसांना घाबरत नाही,’ अशी धमकी देऊन तो पळून गेला. घाबरलेल्या व्यावसायिकांनी पोलिसांकडे धाव घेऊन खंडणीखोर गुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. वारजे पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून, वरिष्ठ निरीक्षक विश्वजित काईगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपीचा शोध घेण्यात येत आहे, उपनिरीक्षक भरसट तपास करीत आहेत.
बसथांब्यावर थांबलेल्या मजुराने ओळखीच्या तरुणाला जेवण केले का, असे विचारले. त्यामुळे तरुणाने मजुरावर धारदार हत्याराने वार करून जखमी केले. ही घटना सोमवारी (१३ जानेवारी) दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली. व्यंकट मुकुंदा चव्हाण (वय ३६, रा. दत्त मंदिर रोड, वाकड) असे जखमी मजुराचे नाव आहे. त्यांनी वाकड पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, यश शिंदे (वय २०, रा. थेरगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी मजुरी करतात. ते ताथवडे बसथांब्यावर थांबले होते. त्या वेळी तेथे यश शिंदे आला. व्यंकट यांनी यश शिंदे याला ‘तू जेवण केले का,’ असे विचारले. त्याचा राग आल्याने यशने व्यंकट यांच्याशी वाद घातला. त्यानंतर धारदार वस्तूने व्यंकट यांच्या हातावर आणि पोटावर वार करत त्यांना जखमी केले.
  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.