आमदार अमोल पाटील यांच्या मध्यस्तीने पारोळेकरांसाठी टोलधारकांनी राखला तोल. ओळखपत्र व २० रूपयांत सुटणार खाजगी वाहन.

आमदार अमोल पाटील यांच्या मध्यस्तीने पारोळेकरांसाठी टोलधारकांनी राखला तोल. ओळखपत्र व २० रूपयांत सुटणार खाजगी वाहन. पारोळा – राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर सबगव्हाण टोल हा गेल्या ५ महिन्यांपासुन सुरू झाला आहे. यामुळे पारोळा शहरासह सभोवतालील खेडे गावांतील लहान-मोठ्या वाहनधारकांचा खिशाला कैची लागली आहे. दैनंदिन प्रवास करणारे शासकीय, खाजगी कर्मचारी, आपला उदरनिर्वाह भागवणारे व्यावसायिक यांसह या महामार्गाने पारोळा तालुक्यातील आपल्या खाजगी वाहनांनी प्रवास करणारे नागरिक खुप हैराण झाले होते. सबगव्हाण टोल हा पारोळ्यापासुन अवघ्या १५ की.मी.चा आत आहे. अशात धुळे येथे जाण्यासाठी दैनंदिन नागरिकांना टोल अदा करावा लागत होता. या संदर्भात अनेकांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोटी आश्वासने देवुन नागरिकांची दिशाभुल केली. परंतु नागरिकांना टोल हा द्यावाच लागत होता.

या टोल संदर्भात दैनंदिन उद्भवणाऱ्या समस्यांची आमदार मा.अमोल पाटील यांनी दखल घेत शुक्रवारी राष्ट्रीय महामार्ग क्र.६ व टोलधारकांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत टोल संदर्भात पारोळेकरांना दैनंदिन होत असलेल्या जाचाचा पाढाच वाचला गेला, त्यावर येत्या दोन दिवसांत मार्ग काढण्याचे आश्वासन टोलधारकांनी दिले होते.
आज त्याच अनुषंगाने आमदार अमोल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली टोलधारकांसमवेत बैठक पार पडली. या बैठकीत पारोळेकरांना आपला रहिवास पुरावा आधार कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स दाखवुन अवघ्या २० रूपयांत एका बाजुने टोल अदा करावा लागणार आहे. तसेच हा टोल अदा करतांना सिस्टीमने अगर टोलची पुर्ण रक्कम कट झाली तर ती देखील रक्कम त्या वाहनधारकास परत करण्यात येईल.

या निर्णयाने पारोळेकरांना खिशाला लागणारी कैची थांबणार असुन वाहनधारकांचा मागणीनुसार आमदार अमोल पाटील यांच्या मध्यस्तीने रहीवास पुरावा दाखवल्यास २० रूपयांत पारोळेकरांची वाहने सुटणार आहेत. या निर्णयानंतर आमदार अमोल पाटील यांनी टोलधारकांचा सत्कार करत आभार मानले.व उपस्थित वाहन धारकांनी आमदार अमोल पाटील यांनी दैनंदिन होणार त्रास मार्गी लावल्याबद्दल सत्कार करत आभार मानले.प्रसंगी तालुकाप्रमुख मधुकर पाटील, शहरप्रमुख अमृतभ चौधरी, राजु परदेशी, जनरल मॕनेजर लतीफ शेख, प्रोजेक्ट मॕनेजर नरेंद्र खैरनार यांचेसह पारोळा तालुक्यातील वाहन धारक उपस्थित होते.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.