धनंजय देशमुख यांचा आक्रमक पवित्रा, टॉवरवर चढून आत्मदहनाचा इशारा

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिन्यांहून अधिक कालावधी उलटला आहे. तरी अद्याप याप्रकरणातील एक आरोपी फरार आहे. तर इतर आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे.त्यातच आता संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे वाल्मिक कराडवर मोक्का लावावा अशी मागणी केली जात आहे. या मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. मस्साजोगमधील ग्रामस्थांकडून सध्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखही सहभागी झाले आहेत. मागण्या मान्य न झाल्यास टाकीवरून उडी घेण्याचा इशारा धनंजय देशमुख यांनी दिला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे दिवसाढवळ्या अपहरण करून त्यांची अतिशय निर्दयपणे व क्रूरतेने हत्या करण्यात आली. त्याला ३५ दिवस झाले, तरीही कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही मोकाटच आहे. तसंच इतर आरोपींच्या मोबाइलचे सीडीआर काढले का?, संतोष देशमुख यांची हत्या करताना आरोपींनी कॉल व व्हिडीओ कॉल कोणाला केले? सरपंच देशमुख खून प्रकरणाच्या तपासाबाबत आपल्याला माहिती दिली जात नाही. खंडणी ते खून प्रकरणातून कोणाला तरी वाचवण्यात येतेय काय?, अशी शंका आपल्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे आरोपी सुटले, तर त्यांच्या हाताने आपल्याला व कुटुंबीयांना संपविण्यात येणार आहे. त्यामुळे आम्हीच टॉवरवर चढून वरून खाली उडी मारून आपले जीवन संपवण्याचा निर्णय गंभीर्यपूर्वक व विचारपूर्वक घेतल्याचे धनंजय देशमुख यांनी काल सांगितले होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.