रावेर तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी ग्रामीण भागात BSNL ची रेंज नसल्याने नागरिक झाले हैराणरावेर तालुक्यातील तिड्या,अंधारमळी, मोहमांडली या अतिदुर्गम आदिवासी भागात मध्ये पहिल्यांदा BSNL चे टावर उभारून जवळ जवळ दीड ते दोन महिने पूर्ण झालेले आहे म्हणून बऱ्याच नागरिकांनी BSNLचे सिम कार्ड घेतलेले असून काही नागरिकांनी जिओ आणि व्ही आय तसेच एअरटेल सिम कार्ड पोरटिंग करून घेतले आहे.
कारण BSNLची सेवा ही स्वस्त आणि मस्त आहे असे अगोदर बोलले जात होते परंतु गावाच्या गावात कॉल करण्यासाठी रेंज मिळत नसल्याने बरेचसे नागरिक BSNL कडे पाठ ठेवताना दिसत आहे कारण की मोबाईल मध्ये नेट ची रेंज येते परंतु कॉलिंग साठी प्रॉब्लेम येत आहे आणि केव्हा केव्हा तर नेटवर्क सुद्धा गायब होऊन जात याच्याकडे अधिकाऱ्यांनी वेळीच दखल घेतली नाही तर BSNL टॉवर हे शोपीस दाखवा म्हणून उभे असतील असे नागरिकांचे मत आहे.








