रावेर पोलीस स्टेशनच्या वतीने हिदु, मुस्लीम, बौध्दं व इतर सर्व समाजात एकता व जातीय सलोखा तसेच धर्मसमभाव या दृष्टीकोनातुन एकता क्रिकेट मॅच संपन्न

रावेर पोलीस स्टेशनच्या वतीने हिदु, मुस्लीम, बौध्दं व इतर सर्व समाजात एकता व जातीय सलोखा तसेच धर्मसमभाव या दृष्टीकोनातुन एकता क्रिकेट मॅच संपन्न पोलीस अधिक्षक  डॉ. महेश्वर रेडडी सो जळगांव जिल्हा यांचे संकल्पनेतुन संपुर्ण जिल्हयात हिदु, मुस्लीम, बौध्दं व इतर सर्व समाजात एकता व जातीय सलोखा तसेच सर्व धर्मसमभाव या दृष्टीकोनातुन एकता क्रिकेट मॅच या उपक्रमांच्या माध्यमातुन दिनांक-१२/०१/२०२४ रोजी अपर पोलीस अधिक्षक मा. अशोक नखाते सो. जळगांव परिमंडळ जळगांव व सहा. पोलीस अधिक्षक.अन्नपुर्णा सिंह, फैजपुर विभाग फैजपुर यांचे मार्गदर्शनात रावेर पोलीस स्टेशनच्या वतीने रावेर शहरातील व रावेर ग्रामीण भागातील सर्व धर्मीय खेडाळु यांची एकता क्रिकेट कपचे व्हि. एस. नाईक कॉलेज रावेर च्या मैदानात रावेर पोलीस निरिक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांचेकडुन आयोजन करण्यात आले होते.

सदर एकता क्रिकेट कप मध्ये त्यात १. रसलपुर रॉयल संघ संघ नायक रवि तायडे, २. वाघोड वॉरियर्स संघनायक-अतुल विचुरक, ३. रावेर टायगर संघ संघनायक पंडीत धनगर, ४. पाल रॉयल संघ संघनायक जुम्मा तडवी, ५. के-हाळा फायटर्स संघ संघनायक ईरफान शेख, ६. होमगार्ड पोलीस पाटील पत्रकार संघ- संघनायक-राहुल कासार असे ०६ संघ सहभागी झाले होते. शेवटचा अंतिम सामाना रसलपुर रॉयल विरुध्द वाघोड वारियर्स यांच्यात झाला, शेवटच्या रोमांचक अंतिम सामान्यात रसलपुर रॉयल संघाने वाघोड संघास पराभुत करुन एकता क्रिकेट कप २०२५ हा आपल्या नावावर केला. एकता कप क्रिकेटचा मॅन ऑफ द सिरिजउत्कृष्ट फलंदाज म्हणुन रितेश पवार, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणुन मुजाहिद, उत्कृष्ट गोलदांज म्हणुन अतुल विंचुरकर अशांना सन्मानित करण्यात आले. मॅन ऑफ द मॅच म्हणुन रितेश पवार यास अर्वाड देण्यात आला. त्यांने संपुर्ण सिरिस मध्ये २४ रन काढुन ०३ विकेट घेतल्या.

सदर एकता क्रिकेटचे उध्दाटन जळगांव जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी मा. अंकीत साहेब यांचे हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुने म्हणुन सहा. पोलीस अधिक्षक मा. अन्नपुर्ण सिंह फैजपुर विभाग हे उपस्थितीत होते. तहसिलदार रावेर मा. बंडु कापसे, गट विकास अधिकारी मा. खेमचंद वानखेडे रावेर पंचायत समिती, तसेच रावेर तालुक्यातील व रावेर शहरातील हिदु-मुस्लीम, बौध्द व सर्व धर्मातील प्रतिष्ठीत नागरीक, शांतता समिती सदस्य हजर होते सदर एकता क्रिकेट सिरिसचे कॉमेन्टटर म्हणुन भुषण चौधरी यांनी काम पाहीले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पोउनि / घनशयाम तांबे, पोहेकों/विठठल देशमुख, पोना/ पुरुषोत्तम पाटील व पोकों/ नितीन सपकाळे अशानी विशेष परिश्रम घेतले.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.