आईच्या साडीच्या पदरामुळे बचावली : झोपलेल्या मुलीला उचलून पळवून नेण्याचा प्रयत्न फसला..!

आईच्या साडीच्या पदरामुळे बचावली : झोपलेल्या मुलीला उचलून पळवून नेण्याचा प्रयत्न फसला..!

जळगाव ग्रामीण प्रतिनिधी : प्रथमेश जोशी

तालुक्यातील आर्वी येथे बारा वर्षीय विद्यार्थिनीला रात्री झोपेतून उचलून अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना पाचोरा तालुक्यातील आर्वी येथे समोर आली आहे. या प्रकरणी संशयित परप्रांतीय व्यक्तीवर पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.तालुक्यातील आर्वी येथे दि. ४ जुलै रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास १२ वर्षीय मुलगी कुटुंबातील सदस्यांसोबत झोपलेली होती. विनोदकुमार बच्छावसिंग पटेल (वय ३७, सेक्टर- ६ टकहीया पहाडी वॉर्ड- १५ परसोइ ओझर, सोनभद्र, उत्तर प्रदेश) असे संशयिताचे नाव आहे. याने तिचे झोपेत तोंड दाबून खांद्यावर उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या हातात आईच्या साडीचा पदर असल्याने साडी ओढली गेली व तिच्या आईला जाग आली.

या प्रकाराने भयभीत झालेल्या तिच्या आईने आरडाओरड करताच संशयिताने मुलीला सोडून तेथून पळ काढला. या संशयिताचा मुलीच्या नातेवाइकांनी शोध घेतला, परंतु तो आढळून आला नाही. घटनेची खबर पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांना मिळताच त्यांनीही तपासाचे चक्र गतिमान करत त्याचा शोध घेतला. त्यास ताब्यात घेत पाचोरा पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबलभगवान चौधरी करीत आहेत.

Related Posts

महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.