नंदुरबार जिल्हाशल्य चिकित्सक डॉ वर्षा लहांडे यांच्या एकाधिकार शाही व गैरवर्तणुकी बाबत चौकशी करा ,राष्ट्रीय एकता परिषद ची मागणी… नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या निर्मिती नंतर या आदिवासी जिल्हयातील सर्व सामान्य जनतेला अपेक्षीत, दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतील परंतु जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मनमर्जी कारभारामुळे रुग्णांचे हाल होत आहे त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक वर्षा लहांडे यांची तत्काळ बदली करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय एकता परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.डॉ वर्षा लहांडे हे अधिकारी व कर्मचारी यांना दबावात ठेऊन अरेरावीची भाषा वापरणे, अभ्यंगताना मोबाईल कॅबीन बाहेर ठेवायला लावणे.
वैद्यकिय अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करणे. प्रतिनियुक्तीचे अधिकार नसतांना आदेश देणे किंवा रद्द करणे. तदर्थ नुतनीकरण करणे यासाठी आर्थिक व्यवहार करणेस भाग पाडणे या सारख्या अनेक तक्रारी यांच्या विरोधात आहे. त्यांच्यावर स्त्रीभ्रूण हत्या या सारखा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याने त्याचा नाशिक येथील खाजगी रुग्णालय शासनाने सिल केलेला आहे. अश्या परिस्थितीत त्यांची नियुक्ती हि आदिवासी बहुल भागात जिल्हयात जिल्हाशल्य चिकित्सक या पदावर कशी केली गेली?
हे अतिशय गंभीर बाब असुन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वैशाला हांडे यांच्यावर कारवाई करून त्यांची बदली तरत्र करावे अशी मागणी राष्ट्रीय एकता परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे जर ही मागणी मान्य झाली नाही तर तीव्र स्वरूपाच्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष रोहिदास वळवी यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते…









