सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालय येथेविभागीय लोकशाही दिन आणि विभागीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन

सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालय येथेविभागीय लोकशाही दिन आणि विभागीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवार, दिनांक 13 जानेवारी, 2025 रोजी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विभागीय महसूल उपायुक्त अरुण आनंदकर यांनी दिली आहे. नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालय येथे सकाळी 11 वाजता होणाऱ्या विभागीय लोकशाही दिन कार्यक्रम विभागातील सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.

दरम्यान, याच वेळेस विभागीय महिला लोकशाही दिनाचेही आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेद्वारे सोडवणूक करण्यासाठी या दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

यापूर्वी ज्या समस्याग्रस्त व पीडित महिलांनी तालुकास्तर व जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिनात अर्ज केलेले असतील व त्यांच्या समस्येचे उत्तर मिळाले नसेल त्यांनी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे टोकन नंबरसह त्यांचे अर्ज दिनांक 13 जानेवारी रोजी विभागीय महिला लोकशाही दिनात सकाळी 11 वाजता सादर करावेत, असे आवाहन विभागीय उपायुक्त, महिला व बालविकास विभाग, नाशिक यांनी केले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.