पत्रकार मुकेश चंद्राकार यांच्या हत्येची घटना ताजी असताना आणखी एका पत्रकाराच्या कुटुंबाची हत्येचं प्रकरण समोर आलं आहे. छत्तीसगडच्या सुरजपूरमध्ये शुक्रवारी संपत्तीच्या वादातून पत्रकार संतोष कुमार टोपो यांच्या कुटुंबातील तीन जणांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. पत्रकार मुकेश चंद्राकार यांच्या हत्येची घटना ताजी असताना आणखी एका पत्रकाराच्या कुटुंबाची हत्येचं प्रकरण समोर आलं आहे. छत्तीसगडच्या सुरजपूरमध्ये शुक्रवारी संपत्तीच्या वादातून पत्रकार संतोष कुमार टोपो यांच्या कुटुंबातील तीन जणांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्याकांडामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
पत्रकार संतोष यांच्या आई, वडील आणि भावाची हत्या करण्यात आली. घटना शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. त्यावेळी संतोष यांचे आई, वडील जगन्नाथपूरमधील खरगवातील शेतात काम करत होते. संतोष यांचं कुटुंब आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये बऱ्याच कालावधीपासून संपत्तीवरुन वाद सुरु होता. शनिवारी संतोषचे कुटुंबीय आणि त्यांचे काका यांच्यात वाद झाला. या वादानं टोक गाठलं. त्यानंतर काकानं संतोषच्या आई, वडिलांवर धारदार हत्यारानं हल्ला केला. त्यात संतोष यांच्या आई, वडिलांचा जागीच मृत्यू झाला. आरोपीनं अतिशय निर्घृणपणे त्यांच्यावर कुऱ्हाडीनं वार केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. संतोष यांचे काका आणि अन्य संशयित नातेवाईकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.