यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे जिल्हा प्रशासनामार्फत आवाहन

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे जिल्हाप्रशासनामार्फत आवाहनमराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष २०२४ करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन निवासी उप जिल्हाधिकारी भिमराज दराडे यांनी केले आहे.
पुरस्कारांसाठीच्या सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई ४०००२५ अथवा जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथील सामान्य शाखेत दिनांक १ जानेवारी, २०२५ ते ३१ जानेवारी २०२५ पर्यंत पाठविता येणार आहेत.

दिनांक १ जानेवारी, २०२४ ते ३१ डिसेंबर, २०२४ या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई ४०० ०२५ यांच्या कार्यालयात अथवा जिल्हाधिकारी कार्यालयात विनामूल्य उपलब्ध होणआर आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर “नवीन संदेश” या सदरात स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार २०२४ नियमावली व प्रवेशिका या शिर्षाखाली व ‘What’s new’ या सदरात Late Yashwantrao Chavan State Literature Award 2024 Rules Book and Application Form’ या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध आहेत.

प्रवेशिका पूर्णतः भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक १ जानेवारी, २०२५ ते ३१ जानेवारी २०२५ या विहित कालावधीत पोहचतील अशा बेताने पाठवायच्या आहेत. लेखक / प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात. लेखक / प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना बंद लिफाफ्यावर / पाकीटावर ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार २०२४ साठी प्रवेशिका’ असा स्पष्ट उल्लेख करावा. प्रवेशिका व पुस्तके स्विकारण्याचा अंतिम दिनांक ३१ जानेवारी, २०२५ हा राहील. विहित कालमर्यादनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारल्या जाणार नाहीत. याची नोंद इच्छूकांनी घ्यायची आहे.

  • Related Posts

    नशा करण्यासाठी पैसे द्यायला नकार दिल्याने अल्पवयीन मुलाने मित्राचाच काटा काढला, घटनेनं खळबळ

    नशा करण्यासाठी पैशाची गरज असताना सोळा वर्षीय मित्राने आपल्या चौदा वर्षीय मित्राकडे मागणी केली. त्याने नकार दिला असता सोळा वर्षीय अनिरुद्ध कदम याने हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नशा…

    टोरेसविरोधात तक्रारींचा पाऊस; मुंबईत आत्तापर्यंत दीड हजारपेक्षा जास्त प्रकरणे समोर

    शिवाजी पार्क पोलिस ठाण्याबरोबरच वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूकदार तक्रारीसाठी गर्दी करीत असून, मुंबईत आतापर्यंत जवळपास दीड हजारपेक्षा जास्त तक्रारी आल्या आहेत.दामदुप्पट परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून फसवणाऱ्या ‘टोरेस’विरुद्ध तक्रारदारांचा ओघ सुरूच आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    नशा करण्यासाठी पैसे द्यायला नकार दिल्याने अल्पवयीन मुलाने मित्राचाच काटा काढला, घटनेनं खळबळ

    नशा करण्यासाठी पैसे द्यायला नकार दिल्याने अल्पवयीन मुलाने मित्राचाच काटा काढला, घटनेनं खळबळ

    टोरेसविरोधात तक्रारींचा पाऊस; मुंबईत आत्तापर्यंत दीड हजारपेक्षा जास्त प्रकरणे समोर

    टोरेसविरोधात तक्रारींचा पाऊस; मुंबईत आत्तापर्यंत दीड हजारपेक्षा जास्त प्रकरणे समोर

    हॉटेलमधून ‘एमडी’ तस्करी; नाशकात ७८.५ ग्रॅम अमली पदार्थ जप्त, तीन महिलांसह एकाला अटक

    हॉटेलमधून ‘एमडी’ तस्करी; नाशकात ७८.५ ग्रॅम अमली पदार्थ जप्त, तीन महिलांसह एकाला अटक

    नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील दुर्लक्षित वारसास्थळ असलेल्या नारायणपुर गावातील पुरातन वास्तू श्री विष्णू नारायण मंदिर.

    नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील दुर्लक्षित वारसास्थळ असलेल्या नारायणपुर गावातील पुरातन वास्तू श्री विष्णू नारायण मंदिर.

    कुर्ल्यातील हॉटेलमध्ये भीषण आग, मोठे नुकसान, नागरिकांमध्ये घबराट

    कुर्ल्यातील हॉटेलमध्ये भीषण आग, मोठे नुकसान, नागरिकांमध्ये घबराट

    कवियत्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांव येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

    कवियत्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांव येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन