इनर व्हिल क्लब ऑफ जळगावचा पदग्रहण सोहळा संपन्न; नविन कार्यकारिणीची घोषणा.

इनर व्हिल क्लब ऑफ जळगावचा पदग्रहण सोहळा संपन्न; नविन कार्यकारिणीची घोषणा

‘संख्यात्मकदृष्ट्या विचार न करता गुणवत्तापूर्ण उपक्रमावर भर देणार असून इनर व्हिल क्लबच्या अध्यक्षपदामुळे जबाबदारी वाढली आहे. आज पहिल्याच दिवशी सायकल वाटप, आर्थिकदृष्ट्या आवश्यकता असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक मदत करण्याची घोषणा त्यांनी केली. इनर व्हिल क्लब ऑफ जळगाव जिल्हा ३०३ चा आज (ता.५) ला हॉटेल नैवेद्य येथे पदग्रहण सोहळा निशा जैन यांच्या प्रमूख उपस्थितीत झाला. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर इनर व्हिल क्लबच्या मावळत्या अध्यक्ष डॉ. रितु कोगटा, सचिव डॉ. मयूरी पवार, नवनियुक्त अध्यक्ष उषा जैन, सचिव निशिता रंगलानी उपस्थित होत्या. मान्यवर उपस्थितांसह माजी अध्यक्ष नुतन कक्कड, संगिता घोडगावकर, मिनिल लाठी यांच्याहस्ते दीपप्रज्वलन झाले. उषा जैन अध्यक्ष पदासाठी तर सचिवपदासाठी निशिता रंगलानी यांना बॅज पिनिंग पदाधिकारींच्या उपस्थित झाले. २०२४-२०२५ करिता निवड झालेल्या कार्यकारिणीची घोषणा उषा जैन यांनी केली. कोषाध्यक्ष गुंजन कांकरिया, आयएसओ रूचि चांदिवाल, सीसी रंजन शहा, सीसीसी डॉ. शितल अग्रवाल, कार्यकारिणी सदस्य दिप्ती अग्रवाल, साधना गांधी, ज्योत्स्ना रायसोनी, संध्या महाजन, शैला कोचर, सल्लागार नुतन कक्कड, निता जैन यांची निवड करण्यात आली. निशा जैन यांच्यासह अध्यक्ष, सचिवांच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला. डॉ. मयूरी पवार यांनी आभार मानले. दिप्ती अग्रवाल, निकिता मयूर अग्रवाल यांनी सूत्रसंचालन केले.. डॉ. रितु कोगटा यांनी मागील दोन वर्षात इनर व्हील क्लब ने केलेल्या कार्याचा आढावा घेत नविन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्यात. डॉ. मयुरी पवार, निशिता रंगलानी यांनीही मनोगत व्यक्त केले. इनर व्हिल क्लबचा लोगो आलेल्या पदाधिकारी व पाहुण्यांच्या वाहनांवर लावण्यात आला.

सामाजिक बांधिलकीतून नम्रतेने काम करा- निशा जैन आपण समाजाकडून भरपूर घेत असतो ते सामाजिक बांधिलकीतून नम्रतेने सर्वसामान्यांना परत केले पाहिजे. नाविन्यता व कल्पकतेतून इनर व्हिल क्लबच्या उद्दिष्ट्यांची पेरणी समाजात करायची आहे. ही जबाबदारी विद्यमान अध्यक्ष उषा जैन यांच्यासह महिलांच्या टिमवर्कच्या माध्यमातून यशस्वी करतील व मैत्रभावनेतून प्रत्येक उपक्रम राबविला जाईल, अशा शुभेच्छा प्रमुख अतिथी म्हणून अनुभूती निवासी स्कूलच्या संचालिका निशा जैन यांनी दिल्यात.

इनर व्हिल क्लब ऑफ जळगाव जिल्हा ३०३ चा पदग्रहण सोहळ्याप्रसंगी उषा जैन यांना अध्यक्ष पदाची बॅज पिनिंग करताना डॉ. रितु कोगटा, डॉ. मयुरी पवार, सौ. निशा जैन, सेक्रेटरी निशिता रंगलानी.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.