घराबाहेर भीक मागायचा, पत्नी भिकाऱ्याच्या प्रेमात पडली; पती आणि ६ मुलांना सोडून पळाली

 ६ मुलांची भिकाऱ्याच्या प्रेमात पडली आणि घरातून पळाली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. देशभरात पती किंवा पत्नी लग्नानंतरही इतरांच्या प्रेमात पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना समोर आली असून एका तरुणाची पत्नी थेट भिकाऱ्यासोबत पळून गेल्याचं प्रकरण समोर आलं आहे. पीडित तरुणाने याप्रकरणी आपली पत्नी आणि भिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.४५ वर्षीय राजू उत्तर प्रदेशातील हरदोई इथे आपल्या पत्नी आणि सहा मुलांसोबत राहतो. राजू आणि त्याचं कुटुंब राहतं त्या भागात नन्हे पंडित नावाचा भिकारी भीक मागण्यासाठी येत होता. तो अनेकदा राजू याची पत्नी ३६ वर्षीय राजेश्वरीaशी बोलायचा. त्यानंतर हळूहळू दोघांमध्ये फोनवरही बोलणं होऊ लागलं होतं, अशी माहिती राजूने पोलिसांत तक्रार करताना दिली.
राजूने दिलेल्या माहितीनुसार, ३ जानेवारीच्या दुपारी २ वाजता माझ्या पत्नीने आमच्या मुलीला खुशबूला ती बाजारात कपडे आणि भाजी आणण्यासाठी जात असल्याचं सांगितलं. दुपारी घराबाहेर पडलेली पत्नी रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचली नव्हती. त्यावेळी तिची सगळीकडे शोधाशोध सुरू झाली.काही दिवांपूर्वी राजूने त्यांच्या घरातील एक म्हैस विकली होती. ती म्हैस विकून आलेले पैसे घेऊन त्याची पत्नी घरातून घेऊन निघाली होती. पत्नी कुठेही न आढळल्याने पतीला ती भिकारी नन्हे पंडितसोबत गेली असावी असा संशय आला. त्यानंतर त्याने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली.पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ८७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कलमांतर्गत एखाद्या महिलेचं लग्न करून देण्याच्या उद्देशाने तिचं अपहरण करणं किंवा जबरदस्तीने नेल्यास १० वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. त्याशिवाय हरदोई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्हे पंडितचा शोध सुरू आहे. मात्र राजेश्वरीची सहा मुलं सध्या आपल्या आईच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.