विश्वासघात: जळगावच्या महिला व्यापाऱ्याची लाखो रुपयात फसवणूक, असे गंडविले.

फसवणुकीच्या घटना थांबता थांबत नसून याच दरम्यान जळगावच्या पिंप्राळा भागात फसवणुकीची एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामध्ये स्थानिक महिला व्यापाऱ्याची 2 लाख 34 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात महिलेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी गोरख कैलास दुधरे याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांचन सुरेश येवले (वय 38) ह्या पिंप्राळा भागातील संत मिराबाई नगर येथे राहतात आणि त्यांचा पशूखाद्य खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. संशयित आरोपी गोरख कैलास दुधरे (रा. गल्ले बोरगाव, ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजी नगर) याने कांचन येवले यांच्याशी संपर्क साधला आणि विश्वास संपादन करून त्यांना 170 पशूखाद्याच्या गोण्या पाठवून देण्याची विनंती केली. आरोपीने सांगितले की त्याला हा सामान व्यवसाय करण्यासाठी आवश्यक आहे.

कांचन येवले यांनी आरोपीवर विश्वास ठेवून दिलेल्या ऑर्डरप्रमाणे 2 लाख 34 हजार रुपये किंमतीच्या 170 पशूखाद्याच्या गोण्यांनी भरलेला ट्रक स्वतः जाऊन आरोपीला पोहचवून दिला. मात्र, दिलेल्या ऑर्डरप्रमाणे पैसे न देता आरोपीने महिला व्यापारी यांची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, कांचन येवले यांनी सोमवार, 30 डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.तक्रारीच्या आधारावर संशयित आरोपी गोरख कैलास दुधरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार विजय पाटील हे पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे स्थानिक व्यापारी समुदायात खळबळ माजली आहे

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.