सेवानिवृत्त लष्करी अधिकार्‍याचे घर फोडले

भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जामखेड रस्त्यावरील वैद्य कॉलनी येथील सेवानिवृत्त लष्करी अधिकार्‍याचा बंगला फोडून चोरांनी सुमारे 4 लाख 60 हजारांचा ऐवज लुटून नेला. ही घटना 21 ते 27 डिसेंबर दरम्यान घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल सर्जेराव शिवाजी नागरे (रा. भाग्योदय कॉलनी, वैद्य कॉलनी जामखेड रोड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. कर्नल सर्जेराव नागरे 21 ते 27 डिसेंबर दरम्यान कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. तिच संधी साधून चोरांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील साहित्याची उचकापाचक करून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, साड्या असा सुमारे 4 लाख 60 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. 30 डिसेंबर रोजी ही घटना घडकीस आली. त्यानंतर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी पथकासह भेट दिली असून, गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे करीत आहेत.केडगाव उपनगरातील भूषणनगरमध्ये पाण्याच्या टाकीजवळ घराचा दरवाजा तोडून चोरांनी सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.

ही घटना 24 ते 29 डिसेंबर दरम्यान घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत प्रमोद गुलाब जासूद(रा. पाण्याच्या टाकीजवळ भूषणनगर, केडगाव) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादी घटना 24 ते 29 डिसेंबर दरम्यान बाहेरगावी असताना चोरांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील साहित्याची उचकापाचक करून कपाटातील सोन्या-चांदीचे 38 हजारांचे दागिने चोरून नेले, असे फिर्यादीत म्हटले आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे,सहायक पोलीस निरीक्षक विकास काळे यांनी भेट दिली असून, पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या आहेत.याबाबत सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल सर्जेराव शिवाजी नागरे (रा. भाग्योदय कॉलनी, वैद्य कॉलनी जामखेड रोड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. कर्नल सर्जेराव नागरे 21 ते 27 डिसेंबर दरम्यान कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. तिच संधी साधून चोरांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील साहित्याची उचकापाचक करून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, साड्या असा सुमारे 4 लाख 60 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.30 डिसेंबर रोजी ही घटना घडकीस आली. त्यानंतर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी पथकासह भेट दिली असून, गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे करीत आहेत.केडगाव उपनगरातील भूषणनगरमध्ये पाण्याच्या टाकीजवळ घराचा दरवाजा तोडून चोरांनी सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना 24 ते 29 डिसेंबर दरम्यान घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत प्रमोद गुलाब जासूद(रा. पाण्याच्या टाकीजवळ भूषणनगर, केडगाव) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादी घटना 24 ते 29 डिसेंबर दरम्यान बाहेरगावी असताना चोरांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील साहित्याची उचकापाचक करून कपाटातील सोन्या-चांदीचे 38 हजारांचे दागिने चोरून नेले, असे फिर्यादीत म्हटले आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे,सहायक पोलीस निरीक्षक विकास काळे यांनी भेट दिली असून, पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.