जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर! अवैध वाळू उपसा करणाऱ्या आठ ट्रॅक्टरवर कारवाई

जळगाव जिल्ह्यात सध्या अवैध वाळू वाहतूक प्रकरण तापले असून गेल्या काही दिवसापूर्वी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना आळा घालायला गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ला झाला होता. तसेच वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अनेकांना जीवावर मुकावे लागले आहे. यामुळे आता जिल्हा प्रशासनाकडून कडक कारवाई केली जात आहे. अशातच धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावाजवळ असलेल्या गिरणा नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या आठ ट्रॅक्टरवर कारवाई केली. या कारवाईत आठ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आणि संबंधित 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव शहरापासून जवळ असलेल्या बांभोरी गावातील किरण नदीपत्रातून अवैधपणे वाढू उपसा करणाऱ्या आठ ट्रॅक्टर वर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये अक्षय भास्कर पाटील, उज्वल कैलास पाटील, गणपत पुंडलिक नन्नावरे, जितेंद्र लक्ष्मण नन्नावारे, विशाल विजय सपकाळे, किरण त्रंबक पाटील, ज्ञानेश्वर गुलाब पाटील सर्व रा. पाळधी, बांभोरी आहेत.यांच्यावर कारवाई करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आठ ट्रॅक्टरवर केलेली कारवाई ही एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे पर्यावरण संरक्षण आणि कायद्याचे पालन करण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक संदेश दिला जातो. भविष्यातही असे अवैध प्रकार रोखण्यासाठी पोलीस पथकाने निरंतर कारवाई करणे आवश्यक आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..