राजगुरूनगर येथे दोन लहान मुलींवर बलात्कार करून हत्या करणारा हॉटेलमधील वेटर अजय दास (५४, रा. पश्चिम बंगाल) याला पोलिसांनी अटक केली आहे.कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत असतानाच मुलींवरील अत्याचाराचे सत्र कायम आहे. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये हॉटेलमधील एका वेटरने आठ आणि नऊ वर्षांच्या सख्ख्या बहिणींवर बलात्कार करून त्यांची हत्या केल्याचा आणि दोघींचेही मृतदेह दोन दिवस पाण्याच्या बॅरलमध्ये लपवून ठेवल्याचा नृशंस प्रकार उघडकीस आला आहे. दुसरीकडे, लोणावळ्याजवळील विसापूर किल्ल्यावर एका पोलिसानेच मद्यधुंद अवस्थेत एका चिमुरडीशी लैंगिक चाळे केल्याने संतापाची लाट पसरली.










