महाबीजची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अकोल्यात संपन्न

महाबीजची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अकोल्यात संपन्न  महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा डॉ पंजाबराव देशमुख कृषि महाविद्यालय, कृषी नगर, अकोला येथील डाँ. के. आर. ठाकरे सभागृहात शनिवार दिनांक २१ डिसेंबर रोजी पार पडली. सन २०२३-२४ या वर्षात महाबीजने एकूण ५,७६,२१९ क्विंटल बियाणे खरीप/रब्बी व उन्हाळी हंगामात विक्री केलेले आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात महाबीजची एकूण आर्थिक उलाढाल ५३७५६.७४ लक्ष रुपये आहे.
वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला महाबीज भवन येथे महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन कृषि राज्यमंत्री महाबीजचे प्रथम अध्यक्ष स्व. नानासाहेब सपकाळ यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.

याप्रसंगी खासदार अनुप धोत्रे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष कोरपे, आयुक्त (कृषी) रावसाहेब भागडे, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर, महाबीज भागधारकांचे संचालक वल्लभराव देशमुख, डाँ रणजीत सपकाळ व महाबीज विभागप्रमुख उपस्थित होते. सभास्थळी महाबीजच्या वतिने भागधारकांना महाबीज कृषी उत्पादनांची माहिती होण्याकरिता विविध दालणे थाटण्यात आली होती. त्यामध्ये ऊती संवर्धित केळी, संकरित पपई, मका, चारा पिके खरिप/रब्बी हंगामातील पिक बाण, भाजीपाला बियाणे व प्रात्यक्षीक व माहिती सादर करण्यात आली. अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी आयुक्त रावसाहेब भागडे महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर, संचालक वल्लभराव देशमुख, डाँ रणजित सपकाळ, कृषी विद्यापिठाचे प्रतिनीधी विठ्ठल सरप पाटील महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी रामदास सिध्दभट्टी राष्ट्रीय बीज निगम चे हेमंत चिरमूरकर व महाबीजे विभाग प्रमुख उपस्थित होते. व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर आणि आयुक्त (कृषी) रावसाहेब भागडे यांनी बीजोत्पादक भागधारकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यावर योग्य निर्णय घेतले. तसेच संचालक वल्लभराव देशमुख व संचालक डाँ रणजीत सपकाळ यांनी भागधारकांच्या समस्येवर योग्य मार्गदर्शन करुन बीजोत्पादक भागधारकांचे समाधान केले. संचालन जितेंद्र सरोदे यांनी केले तर आभार विवेक ठाकरे यांनी मानले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..