चक्रव्युहात अडकलेले धनंजय मुंडे अजितदादांच्या गाडीत; संतोष देशमुखांना संपवणाऱ्या आरोपींना फाशीच …

धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना वाचवण्याचं काम हे सरकार करतंय का? असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नाव घेत विचारला बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी वाल्मिक कराड यांचा संबंध असल्याचे आरोप झाल्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. वाल्मिक कराड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदावर वर्णी लागलेल्या धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्यामुळे त्यांच्या चिंतेतही वाढ झाली आहे. मंत्रिपद मिळाल्यानंतर खातेवाटप बाकी असतानाच धनंजय मुंडे यांचे टेन्शन वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

बीड प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सभागृहात निवेदन दिल्यानंतर आता धनंजय मुंडे कामकाजात सहभागी होणार आहेत. अजित पवार यांच्या गाडीत बसून मुंडे निघाले. यावेळी पुढे अजितदादा, तर बॅकसीटवर धनंजय मुंडे बसल्याचे दिसले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर खातेवाटपाबाबत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर धनंजय मुंडे सभागृहात येणार असल्याची मिळत आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशनात बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण विरोधकांनी चांगलेच उचलून धरले. अखेर शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सभागृहात निवेदन दिले. मात्र बीडमधील मंत्री धनंजय मुंडे यांची उपस्थिती तीव्रतेने जाणवणारी होती. अधिवेशनाच्या सहाव्या आणि शेवटच्या दिवशी अखेर धनंजय मुंडे सभागृहात उपस्थित राहणार आहेत. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना वाचवण्याचं काम हे सरकार करतंय का? असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नाव घेत विचारला. धनंजय मुंडे सरकारमध्ये आहेत, तुम्ही कसली चौकशी करताय? मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाहीसोबत फोटो असले तरी त्यांना सोडणार नाही. पण आम्हाला माहिती आहे की तुमच्यासोबत काहीही संबंध नाही, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. अशाप्रकारे हत्या झाली, की त्याचं समर्थन कुणीच करु शकत नाही. आरोपीने जशा पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या केली, त्या आरोपींना फाशी झाली पाहिजे, यात पोलीस आहेत, केस सीआयडीकडे गेली आहे, दूध का दूध पानी का पानी निघणार आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..